शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ३० टक्केच, आमदार संजय केळकर यांनी दिली माहिती

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 23, 2025 14:59 IST

Thane News: कोकणातील एकुण १,८०,००० हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ३० टक्केच झाले असल्याची माहिती आंबा महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - कोकणातील एकुण १,८०,००० हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ३० टक्केच झाले असल्याची माहिती आंबा महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, २०२२ साली कोकणातील आंब्याचे उत्पादन ३,२०,००० मेट्रीक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि १०० कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पादन घटत जाऊन २०२३ मध्ये २,५६,००० मेट्रीक टन झाले असून १९८ कोटी रुपयांची विक्री देशभर तर ७९ कोटी आंबा निर्यात झाला आहे आणि २०२४ मध्ये १,२८,००० मेट्रीक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला असे त्यांनी सांगितले.

आ. संजय केळकर यांची संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित १८वा आंबा महोत्सव १ मे ते १२ मे या कालावधीत गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केले आहे. कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे ४५ स्टॉल्स असणार आहेत. धान्याचे 5 स्टॉल तर महिला बचत गटांचे 5 स्टॉल असणार आहेत. यावेळी माजी उपमाहापौर अशोक भोईर, सुभाष काळे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते.

यावर्षी अवेळी पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडतुडा किटकांच्या प्रादुर्भावामुळे तीस टक्केच आंबा पीक हाती लागले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. या साऱ्या परिस्थितीचा जाणकार ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल व वाजवी दरातील दर्जेदार आंबा जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल, असा विश्वास आ. संजय यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Mangoआंबाthaneठाणे