शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कॅरम खेळू न दिल्यानेच ठाण्यातील जळीतकांड?, कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:55 IST

कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. कॅरम खेळू न दिल्याने, त्याच सोसायटीमधील काही तरुणांनी ती लावल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. यातील संशयितांना सोमवारी पोलिसांनी नोटीस बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. कॅरम खेळू न दिल्याने, त्याच सोसायटीमधील काही तरुणांनी ती लावल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. यातील संशयितांना सोमवारी पोलिसांनी नोटीस बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुरुवातीला या आगीबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सुब्रमण्यम मुदलीयार आणि योगेश कार्ले यांनी सांगितले होते. नंतर मात्र त्यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या सोसायटीतील मंदार साटम (२०) आणि शांतीनगर येथील अनिकेत शिंदे (२२) या दोघांनी कॅरम खेळण्यासाठी सोसायटीच्या व्यायामशाळेची चावी मागितली होती. मात्र, व्यायामशाळेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे, त्यांनी चावी देण्यास नकार दिला. यातूनच या दोघांनी रहिवाशांना जमा करून, काही काळ गोंधळही घातला होता. त्यांनीच आग लावून गाड्या जाळल्याचा संशय सुब्रमण्यम मुदलीयार यांनी या तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे. त्यानुसार, आता साटम आणि शिंदे या दोघा संशयितांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली. गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.