शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ठाणे पोलिसात दाखल होणार सात जाँबाज,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:31 IST

ठाणे : ठाणे पोलिसांचे हात बळकट करण्याकरिता सात जाँबाज लवकरच दलात सहभागी होणार आहेत. खून, दरोडे, घरफोड्या करणाºयांचा माग घेण्यात त्यापैकी काही तरबेज आहेत, तर स्फोटके ठेवून घातपाती कारवाया करणाºयांचे मनसुबे उधळून लावण्यात काहींचा हातखंडा आहे. हे शूरवीर दुसरे तिसरे कुणी नसून दोन जर्मन शेफर्ड, दोन डॉबरमन आणि तीन लॅब्राडोर ...

ठाणे : ठाणे पोलिसांचे हात बळकट करण्याकरिता सात जाँबाज लवकरच दलात सहभागी होणार आहेत. खून, दरोडे, घरफोड्या करणाºयांचा माग घेण्यात त्यापैकी काही तरबेज आहेत, तर स्फोटके ठेवून घातपाती कारवाया करणाºयांचे मनसुबे उधळून लावण्यात काहींचा हातखंडा आहे. हे शूरवीर दुसरे तिसरे कुणी नसून दोन जर्मन शेफर्ड, दोन डॉबरमन आणि तीन लॅब्राडोर आहेत.राज्यातील पोलीस दलात एकूण ८१ श्वानांच्या भरतीला मंजुरी मिळाली असून त्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील सात नव्या श्वानांचा समावेश होणार आहे. नव्याने दाखल होणाºया सात श्वानांमुळे ठाणे शहर पोलिसांच्या श्वानपथकाचे बळ दुप्पट होणार आहे. त्यांची खरेदी प्रक्रिया सुरू असून प्रशिक्षण झाल्यानंतर ते लवकरच पोलीस दलात दाखल होतील,अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.गुन्ह्यांचा छडा लावण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे, सोशल मीडियाची मदत ठाणे पोलीस घेत असून तंत्रज्ञानाबरोबरच प्रशिक्षित श्वानांची फौज दिमतीला असल्याने गुन्ह्यांची उकल करणे सोपे होणार आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने क्षमतावाढीचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.अशी होते दलात भरतीएखाद्या श्वानाची पोलीस दलात भरती करताना त्या श्वानाचा इतिहास तपासून पाहिला जातो. यापूर्वी पोलीस दलात सेवा बजावलेल्या व कर्तबगारी दाखवलेल्या श्वानाच्या पोटी जन्मलेल्या श्वानाला सेवेत प्राधान्य दिले जाते. एकदोन महिन्यांच्या पिल्लास घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच श्वानाची पोलीस दलात भरती होते.असे आहे पोलिसांचे श्वानबळठाणे शहर पोलीस दलात सध्या २ डॉबरमन व ५ लॅब्राडोर आहेत. नव्या ७ श्वानांमध्ये २ डॉबरमन,२ लॅब्राडोर व ३ जर्मन शेफर्ड यांचा समावेश असणार आहे.स्फोटके आणि अमली पदार्थांचा काढतात मागडॉबरमन हे खून,दरोडे,चोरी,घरफोडी,दंगल,अशा गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेण्यास उपयोगी पडतात. त्यांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. लॅब्राडोर हे स्फोटक पदार्थ शोधून काढतात, तर जर्मन शेफर्ड हे अमली पदार्थांचा माग काढतात.वातानुकूलितमोटार आणि विमानव्याने भरती होणाºया श्वानांसाठी वातानुकूलित गाडीखरेदी करण्यात येणार असून टाटा कंपनीने त्याच्यासाठी खास मॉडेल बनवले आहे. त्यात श्वानाची बसण्याची खास व्यवस्था केली असून पंखा लावला आहे. श्वानांचे औषधाचे कीट, जेवण याकडे लक्ष दिले जाणार आहे. नव्याने दाखल होणाºया सर्व श्वानांचा विमा काढला जाणार आहे.‘‘श्वानखरेदी प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यावर त्यांना अगोदर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर, २०१८ मध्ये ते पोलीस दलात दाखल होतील. त्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.’’- मकरंद रानडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर

टॅग्स :Policeपोलिस