शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या: बाळकूममधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:04 IST

शालांत परीक्षेच्या तणावातून रचना शिंगे या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना बाळकूम येथे गुरुवारी घडली. तिचे चुलते अनिल शिंगे यांनी घराचा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तो तोडला. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.

ठळक मुद्देचुलते अनिल यांना निदर्शनास आला प्रकारकुटूंबिय बाहेर गेल्यानंतर केली आत्महत्या अनेक दिवसांपासून परिक्षेचा तणाव: कुटूंबियांचा दावा

ठाणे : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शालांत परीक्षेच्या तणावातून रचना सुर्यकांत शिंगे या १५ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना बाळकूम येथे गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, तिच्या कुटूंबियांनी तिचे नेत्र मरणोत्तर दान करुन एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला.नौपाडयातील डॉ. बेडेकर विद्यामंदीर या शाळेत शिकणारी रचना बाळकूमच्या नर्मदा निवास येथे दुस-या मजल्यावर वास्तव्याला होती. तिचे वडील सुर्यकांत हे खासगी नोकरीला आहेत. तर आई ब्युटी पार्लर चालविते. त्यामुळे आई दुकानात तर वडील कामावर आणि लहान १२ वर्षीय भाऊ बाहेर गेलेला असतांनाच सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचे चुलते अनिल केशव शिंगे यांनी सकाळी काही कामानिमित्त रचनाच्या घराचा दरवाजा वाजविला. बराच वेळ आवाज देऊन आणि दरवाजा वाजवूनही उघडला न गेल्यामुळे त्यांनी तो तोडला. तेंव्हा तिने गळाफास घेतल्याचे दृश्य त्यांना पहायला मिळाले. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ती दहावी परीक्षेच्या तणावामध्ये होती, असे तिच्या आईवडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, असे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पोलीस उपनिरीक्षक शारदा देशमुख या अधिक तपास करीत आहेत.

रचनाचे मरणोत्तर नेत्रदानरचनाच्या आत्महत्येमुळे तिचा मृतदेह ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी गुरुवारी सकाळी आला. त्यावेळी तिचे डोळे दान करणार का? अशी विचारणा रुग्णालयाच्या वतीने तिच्या वडीलांकडे करण्यात आली. तेंव्हा फारसा विचार न करता पाणावलेल्या डोळयांनीच सूर्यकांत शिंगे यांनी या संकल्पनेला होकार देत तिचे मरणोत्तर नेत्रदान केले. शाळेत नेहमीच हुशार असलेली रचना शालांत परिक्षेतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी तिच्यासह कुटूंबियांचीही अपेक्षा असतांना तिने थोडयाशा तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाSuicideआत्महत्या