शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारिफशच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 16:30 IST

ठाण्यातील क्रीडा क्षेत्रात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या महापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस अ‍ॅकॅडमीच्या जलतरणपटूंनी सुवर्ण, रजत, कांस्य अशा एकूण २० पदकांची लयलुट केली आहे.

ठळक मुद्देमहापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न जलतरणपटूंनी केली २० पदकांची लयलूट वेदांत गोखलेचा ’यंगेस्ट स्वीमर’ म्हणून विशेष सत्कार

ठाणे : कोल्हापूर महानगरपालिका आयोजित व जिल्हा जलतरण संघटना संचलित नुकत्याच अंबाई जलतरण तलाव येथे महापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस अ‍ॅकॅडमीच्या जलतरणपटूंनी विशेष कामगिरी करीत १४ सुवर्ण, ४ रजत, २ कांस्य पदके पटकाविली.       रंकाळा तलाव संवर्धन जलतरण स्पर्धेत स्टारिफश स्पोर्टस अ‍ॅकॅडमीचे सानिका तापकीर व जय एकबोटे यांनी चौथा क्र मांक पटकाविला तर वेदांत गोखले या जलतरणपटूचा ’यंगेस्ट स्वीमर’ म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. अंबाई जलतरण तलाव येथे फ्री स्टाईल, बॉक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय या विविध जलतरण प्रकारात झालेल्या स्पर्धेत सवर अकुसकर हिने सहा सुवर्णपदकांसह स्पर्धेची चॉम्पियनशीप पटकाविली तर आदित्य घाग याने चार सुवर्ण व दोन रजत पदकांसह चॅम्पियनशीप पटकाविली. तसेच, ऋग्वेद पाटील याने एक सुवर्ण व एक कांस्यपदक, नील वैद्य याने एक रजत एक कांस्यपदक तर रियान नरोटे याने एक कांस्यपदक पटकाविले. ठाणे महानगरपालिकेचे प्रशिक्षक व अ‍ॅकॅडमीचे मार्गदर्शक कैलास आखाडे यांनी तीन सुवर्णपदकांसह एक रजतपदक पटकाविले.तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सवर अकुसकर, आदित्य घाग व कैलास आखाडे यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, आ. सतेज पाटील, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी जलतरणपटूंवर ठाणेकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :thaneठाणेSportsक्रीडाMuncipal Corporationनगर पालिका