ठाणे : कळवा-विटावा रेल्वे पुलाखाली पडलेल्या खड्ड्यांच्या कामामुळे सलग दोन दिवस ठाणे-नवी मुंबईत वाहतूककोंडी झाली होती. ती रविवारी तिस-या दिवशीही कायम होती. त्यातच, कसारा-आसनगाव दरम्यानच्या पॉवरब्लॉकमुळे आणि बेलापूर-नेरूळ स्थानकांतील मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांची कोंडी झाली. त्यामुळे रेल्वे अणि रस्ते या दोन्ही मार्गांवरून प्रवास करणाºयांचे हाल झाले.विटावा मार्गावरील वाहतूककोंडी आणि मुलुंड-ऐरोली पुलावरून जाताना होणारी दुहेरी टोलकोंडी, यामुळे टीकेची झोड उठत असतानाच, येथून नवी मुंबईकडे हलकी वाहने सोडण्यास सुरुवात झाली. ठाण्यातील कळवा-विटावा रेल्वे पुलाखालील काम महापालिकेने हाती घेतल्याने, शुक्रवारी पहाटेपासून सलग चार दिवस हा रस्ता बंद ठेवला आहे. त्यामुळे नवी मुंबईतून ठाण्यात येणारी वाहने ऐरोलीकडून आनंदनगर चेकनाकामार्गे ठाण्यात वळविली आहेत. याचा फटका ठाण्यासह नवी मुंबईलाही जाणवला. त्यांना अकारण टोलचा भुर्दंड बसला.शनिवार आणि रविवार अशा सलग दोन दिवसांच्या सुट्ट्या आणि सोमवारी नाताळ आल्याने, तीन दिवसांच्या लाँग वीकेण्डसाठी जाणाºयांची कोंडी झाली. या काळात रस्त्यांवर वाहनांची संख्याही वाढल्याने, ठिकठिकाणी वाहतूककोंडी पाहायला मिळाली. ही कोंडी शुक्रवारी रात्रभर होती. त्यामुळे टीकेची झोड उठताच रविवारी या मार्गावरून मोटारसायकल, रिक्षा आणि कार अशी वाहने सोडण्यात आली. मात्र, अवजड वाहने आणि बससारख्या वाहनांसाठी तो रस्ता अद्यापही बंद ठेवला आहे. हे काम डेडलाइनपूर्वी पूर्ण होऊन मंगळवारपासून वाहतूक या मार्गाने सुरळीत सुरू होईल, असे ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सांगितले.रेल्वेने कसारा मार्गावर पॉवर ब्लॉक घेतल्याने, तेथील अनेक लोकल, मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. बेलापूर-उरण रेल्वेमार्गाच्या कामासाठी त्या मार्गावरून होणाºया वाहतुकीलाही फटका बसला आहे. त्यामुळे रेल्वे व रस्ते दोन्हीकडील प्रवासात प्रवाशांचे हाल झाले.शनिवार, रविवार अशा सलग दोन दिवसांच्या सुट्ट्या आणि सोमवारी नाताळ आल्याने, वीकेण्डसाठी जाणाºयांची संख्या वाढली. मात्र कळवा-विटावा रेल्वे पुलाखालील खड्ड्यांचे काम आणि कसारा-आसनगाव दरम्यानचा पॉवरब्लॉक यामुळे सलग तीन दिवस रेल्वे, रस्ता दोन्ही मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांची कोंडी झाली.
तिस-या दिवशीही कोंडी , ठाणे-नवी मुंबईतील प्रवासात हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:41 IST