शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ठाण्यातील दुकानांमध्ये चोरी करणारे सराईत चोरटे दहा तासांमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 01:26 IST

कासारवडवलीतील सहकार सुपर बाजार या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून दहा हजारांची रोकड आणि काही वस्तू चोरणाऱ्या सर्वेश गौड याच्यासह चार जणांच्या टोळीला कासारवडवली पोलिसांनी दहा तासांमध्ये अटक केली.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कारवाईरिक्षासह ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कासारवडवलीतील सहकार सुपर बाजार या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून दहा हजारांची रोकड आणि काही वस्तू चोरणाºया सर्वेश गौड (21), शंकर हनवते (30), राहुल घोरपडे (19) आणि अक्षय जाधव (27 ) या चार जणांच्या टोळीला कासारवडवली पोलिसांनी दहा तासांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून रिक्षा, चोरीतील टेपरेकॉर्डर असा 87 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी दिली.ठाण्यातील घोडबंदररोड कासारवडवली येथील कांचनपुष्प सोसायटी मध्ये सहकार सुपर बाजारचे मालक २५ आॅक्टोबर रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले. नेहमीप्रमाणे दुसºया दिवशी २६ आॅक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी ते आले असता, त्यांना दुकानाचे बाहेरील बाजूस असलेले लोखंडी शटर हे कोणीतरी उचकटून तोडल्याचे निदर्शनास आले. दुकानातील ड्रॉव्हरमधील 10 हजारांची रोकड आणि दुकानातील टेप रेकॉर्डरची चोरी झाल्याचे आढळले. यापकरणी त्यांनी तातडीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने काशीमीरा, भिवंडी, वागळे इस्टेट आदी परिसरात यातील आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आझाद नगर रोड या ठिकाणी सापळा रचून सर्वेश गौड याच्यासह चौघा सराईत चोरटयांना त्यांनी २६ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून अडीच हजारांची रोकड, चोरीसाठी वापरले रिक्षा आणि टेपरेकॉर्डर असा असा 87 हजार 500 रु पये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध श्रीनगर, वागळे इस्टेट आदी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक