शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रा तोडून मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या चोरटयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:32 IST

कासारवडवली येथील एका मोबाईल दुकानाचा पत्रा तोडून मोबाईलची चोरी करणाºया यश दशरथ गायकवाड (१९) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला ४ जानेवारी पर्यन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कामगिरी ७६ हजारांचे २४ मोबाईल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कासारवडवली येथील एका मोबाईल दुकानाचा पत्रा तोडून मोबाईलची चोरी करणाºया यश दशरथ गायकवाड (१९, रा. साईनाथ नगर, माजीवाडा, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७६ हजारांचे २४ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.कासारवडवलीतील ‘वेलकम मोबाईल शॉप’ या दुकानामध्ये २५ डिसेंसबर २०२० रोजी रात्री १० ते २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुकानाचा पत्रा तोडून चोरटयांनी मोबाईल चोरल्याचे २६ डिसेंबर रोजी दुकान मालकाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर जाधव आणि त्यांच्या पथकाने काशीमीरा, कापूरबावडी आणि वर्तकनगर आदी परिसरात चोरटयांचा शोध घेतला. त्याचदरम्यान, पोलीस पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे यामध्ये यश गायकवाड हा चोरटा असल्याचे उघड झाले. त्याच अनुषंगाने सापळा रचून आनंद नगर येथून त्याला या पथकाने २९ डिसेंबर रोजी अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्याने मोबाईल दुकानातील चोरीची कबूली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे २४ मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याच्यावर चोरी, घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. ठाणे न्यायालयाने त्याला ४ जानेवारी पर्यन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक