शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

'ते' दहीहंडीफेम नेत्याच्या छत्राखाली

By admin | Updated: October 29, 2015 00:41 IST

कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येसंदर्भात अटकेची टांगती तलवार मानेवर असलेल्या नगरसेवकांच्या चौकडीने आपल्यावरील कारवाई टाळण्याकरिता ठाण्यातील

अजित मांडके, ठाणेकॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येसंदर्भात अटकेची टांगती तलवार मानेवर असलेल्या नगरसेवकांच्या चौकडीने आपल्यावरील कारवाई टाळण्याकरिता ठाण्यातील एका दहीहंडीफेम नेत्याच्या छत्रछायेचा आसरा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या आमदाराने उच्च न्यायालयात या नगरसेवकांकरिता चार तज्ज्ञ वकिलांची फौज तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. परमार आत्महत्येप्रकरणी सुधाकर चव्हाण यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २९ आॅक्टोबर रोजी आणि विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची ३१ रोजी होणार आहे. परंतु, हा जामीन अर्ज फेटाळला तर पुढे काय, असा सवाल उभा राहिल्यानेच या चौकडीने दहीहंडीफेम नेत्याकडे धाव घेतल्याचे नगरसेवकांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मनसे, काँग्रेसने केले हात वरपरमार प्रकरणात मनसेचे सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांची नावे पुढे आल्यानंतर मनसे आणि काँग्रेसने या प्रकरणात हात वर केले आहेत. या प्रकरणाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे या दोन नगरसेवकांपुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मदतीने त्या दहीहंडीफेम नेत्याला शरण जाण्याचा मार्ग पत्करला आहे, असे कळते. मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची एक वर्षापूर्वीच गटनेतेपदावरून हकालपट्टी झाली होती. त्यांचे गॉडफादर हे पक्षप्रमुख राज ठाकरे हेच मानले जात होते. परंतु, त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांना माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यामुळेच गटनेतेपद मिळाले होते, परंतु पक्षाच्या विरोधात जाऊन काही कृत्ये केल्याने त्यांची या पदावरून हकालपट्टी झाली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या या कारवाईनंतर ते राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात अधिक आहेत. किंबहुना, मुल्ला यांच्या संपर्कात अधिक असल्याचेच समजते. आता काँग्रेसनेही हात वर केल्याने चव्हाणांनीदेखील अन्य तीन नगरसेवकांचे अनुकरण केले आहे. अन्य नगरसेवकांचीही चौकशी सुरूठाणे : पोलिसांनी पालिकेतील आणखी काही नगरसेवकांची बुधवारी चौकशी केली. तिच्या आधारे ‘त्या’ चार नगरसेवकांबाबत आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर, नगरसेवक नारायण पवार यांच्यासह अन्य काही सदस्यांना बोलवले होते. ठाणे महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांनाही लवकरच चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी अन्य काही नगरसेवकांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसाही बजावल्या आहेत. मला तपासकामी पोलिसांनी बोलवले होते, परंतु कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने मी आज जाऊ शकलो नाही. तपासकामी पोलिसांना सहकार्य करेन असे स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीची पद्धत चुकीची होती. नोटिसा बजावून अशा पद्धतीने बोलवणे अयोग्य आहे. असे काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितले. तर पोलिसांनी पत्र पाठवून तपासकामी सहकार्य करण्यासाठी बोलवले होते. त्यानुसार, बुधवारी हजर राहिलो होतो असे कॉंग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर म्हणाले. दरम्यान घाडीगावकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून त्यांची तीन दिवसांत माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.