शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पडक्या शाळेत भरतात गर्दुल्यांचे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:25 IST

केडीएमसीच्या डोंबिवली मधील विभागीय कार्यालयाला लागून महापालिकेची शाळा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पडिक अवस्थेत असलेल्या या शाळेच्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळेस गर्दुल्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. विभागीय कार्यालयात जागेअभावी वाहन पार्किंगची समस्या जटील बनली असताना या पडक्या वास्तूतील अवैध धंदयांमुळे आवारातील महापालिकेच्या कार्यालयाची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देकेडीएमसीच्या विभागीय कार्यालयाची सुरक्षा धोक्यातवाहन पार्किंगची समस्या जैसे थे

डोंबिवली: केडीएमसीच्या डोंबिवली मधील विभागीय कार्यालयाला लागून महापालिकेची शाळा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पडिक अवस्थेत असलेल्या या शाळेच्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळेस गर्दुल्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. विभागीय कार्यालयात जागेअभावी वाहन पार्किंगची समस्या जटील बनली असताना या पडक्या वास्तूतील अवैध धंदयांमुळे आवारातील महापालिकेच्या कार्यालयाची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विभागीय कार्यालय परिसरात असलेली ही शाळा गेल्या आठ ते दहा वर्षापासून बंद आहे. पटसंख्येअभावी बंद पडलेल्या या शाळेला सद्यस्थितीला अवकळा आली आहे. भिंतींची झालेली पडझड, शाळेच्या छपरावरील कौल तुटलेली, तसेच अनेक वर्षे बंद असलेल्या वर्गामध्येही झाडे देखील उगवली आहेत. या वर्गांच्या दरवाजांना टाळे लावले होते परंतू गर्दुल्यांकडून ती टाळीही तोडण्यात आली असून या शाळेला एकप्रकारे खंडहराचे स्वरूप आले आहे. या शाळेला लागूनच महापालिकेचा आपत्कालीन कक्ष आहे. त्याचीही पुरती दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालय परिसरातील वाहनपार्किंगची समस्या दिवसागणिक बिकट बनत चालली आहे. एकिकडे जागा अपुरी ठरत असताना दुसरीकडे ही पडकी शाळा एकप्रकारे अडगळीची ठरली आहे. यात आता गर्दुल्ले यांचाही मुक्त संचार होऊ लागल्याने याची तत्काळ गांभिर्याने दखल घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या गर्दुल्यांच्या प्रतापामुळे शाळेत मागील काही दिवसांमध्ये आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. मागील भागातून या शाळेच्या वास्तूत बिनदिककतपणे प्रवेश केला जात असल्याने विभागीय कार्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची या गर्दुल्यांचा बंदोबस्त करताना चांगलीच धावपळ उडत आहे. विशेष बाब म्हणजे विभागीय कार्यालयाच्या आवारात सुरक्षेसाठी सी सी टिव्ही कॅमेरे लावण्याबाबतही प्रशासनाची उदासिनता कायम राहीली आहे. यासंदर्भात सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित पडीक शाळा पाडल्यास वाहन पार्किंगला पुरेशी जागा उपलब्ध होईल तसेच सी सी टिव्ही कॅमेरे लावण्याबाबतही पत्रव्यवहार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण