शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

खाडीत उडी घेणाऱ्या भिवंडीतील ‘त्या’ दोघांचाही शोध सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 20:53 IST

एकमेकांवर प्रेम असल्याचा दावा करीत आम्ही आत्महत्या करीत असल्याचा व्हीडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन नंतर खारेगावच्या खाडीत उडी घेणा-या युगूलाचा सोमवारी दुस-या दिवशीही शोध सुरुच होता.

ठळक मुद्देदोघेही कोनगावातील रहिवाशीमुलगी बेपत्ता असल्याची पालकांची तक्रारनारपोली पोलिसांकडून तपास सुरु

ठाणे: खारेगाव खाडीमध्ये उडी घेणा-या शिवपाल चौधरी (२०) आणि खुशी (१७) या दोघांचा यासोमवारी दुस-या दिवशीही पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याकडून शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा कोठेही शोध लागला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.शेरोशायरीच्या चिठ्ठ्या तयार करून आम्ही १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता खारेगाव खाडीत आत्महत्या करत आहोत, असा व्हिडीओ मोबाइलमध्ये तयार करून शिवपाल याने त्याच्या मैत्रिणीसह खारेगाव येथील खाडीत स्वत:ला रविवारी दुपारी झोकून दिले. या दोघांनी खाडीत उडी घेतल्याची माहिती एका वाटसरूने कळवा वाहतूक शाखेच्या पोलिसांना रविवारी दुपारी दिली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना पुलावर एक बॅग मिळाली. या बॅगेत मोबाइल आणि काही चिठ्ठ्या मिळाल्या. आम्ही आत्महत्या करत आहोत, असे सांगणारा व्हिडीओ त्यांनी मोबाइलमध्ये तयार केला होता. शिवपाल हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो एका मालगाडीवर क्लीनरचे काम करतो. कोनगावात ज्या भागात ही मुलगी वास्तव्याला आहे, त्याच भागात तोही वास्तव्याला आहे. दोघांची चांगली ओळख होती. त्यामुळे त्यानेच या मुलीला फूस लावून पळवल्याचा किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा पोलिसांचा संशय आहे. जोपर्यंत ते हाती लागत नाहीत, तोपर्यंत तरी यातील नेमकी वस्तुस्थिती सांगणे अवघड असल्याचे नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक कथोरे यांनी सांगितले. दरम्यान, शिवपालच्या नातेवाइकांनी त्याच्या जाण्याबद्दल फारसा खेद व्यक्त केला नाही. या मुलीच्या नातेवाइकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार कोनगाव पोलीस ठाण्यात रविवारी दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे शिवपालने तिला पळवून नेल्याचीही शक्यताही व्यक्त केली जात आहे..........................दोन वर्षांपूर्वीही अशीच घटनादोन वर्षांपूर्वीही भिवंडीच्या खाडीपुलावर अशाच प्रकारे एका मुलाने आत्महत्येचा बनाव करून गाडी पुलावर सोडून एका मुलीसोबत पलायन केले होते. कालांतराने तो मुलगा एका मुलीसह गुजरातमध्ये वास्तव्याला असल्याची बाब समोर आली होती. असाच हा प्रकार आहे का, त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे