शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांची’ ही वेतनाअभावी होतेय परवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:41 IST

कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसताना सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. परिवहन कर्मचा-यांपाठोपाठ आता बोर्डाच्या कर्मचा-यांचीही वेतनाअभावी परवड सुरू झाली आहे. परिवहन कर्मचा-यांप्रमाणे वेतनाविना घर चालवायचे तरी कसे अशी म्हणण्याची वेळ संबंधित सुरक्षा कर्मचा-यांवर देखील ओढावली आहे.

ठळक मुद्देसुरक्षा बोर्डाचे कर्मचारी दोन महिने वेतनविना

कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसताना सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचा-यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. परिवहन कर्मचा-यांपाठोपाठ आता बोर्डाच्या कर्मचा-यांचीही वेतनाअभावी परवड सुरू झाली आहे. परिवहन कर्मचा-यांप्रमाणे वेतनाविना घर चालवायचे तरी कसे अशी म्हणण्याची वेळ संबंधित सुरक्षा कर्मचा-यांवर देखील ओढावली आहे.केडीएमटी कर्मचा-यांचे वेतन विलंबाने मिळणे हि तर नित्याचीच बाब आहे. महिन्याचे वेतन हे दुस-या महिन्याच्या अखेरीस मिळते काहीवेळेस त्याच्याहून अधिक कालावधी लागतो. हे नेहमीचे झाले असताना नुकतेच याप्रकरणी कर्मचा-यांनी चककाजाम आंदोलन छेडले होते. त्यानंतर लागलीच वेतन महापालिकेकडून अदा केले गेले. परिवहन उपक्रमातील वेतन हे सर्वस्वी केडीएमसीच्या अनुदानावर अवलंबुन आहे. यात उपक्रमातील वाहक-चालक आणि कर्मचा-यांची परवड होत असताना महापालिकेला सुरक्षाविभागासाठी घेतलेल्या बोर्डाच्या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर देणे दुरापस्त झाले आहे. महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे ३४ कर्मचारी केडीएमसीने घेतले आहेत. महापालिका क्षेत्रात ते कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. परंतू जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे वेतन त्यांना मार्च महिना उजाडला तरी मिळालेले नाही. या बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना २० हजाराच्या वर वेतन मिळत असलेतरी त्यांच्या हातात १४ ते १५ हजारापर्यंतच वेतन पडते. मात्र गेले दोन महिने हे कर्मचारी वेतनविना आहेत. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सुरक्षा कर्मचा-यांना फेब्रुवारीचे वेतन देखील मार्च महिन्याच्या दुस-या आठवडयात मिळाले आहे. वेतन उशीराने मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जातेय. दरम्यान बोर्डाच्या सुरक्षारक्षकांच्या वेतनाबाबतची फाईल ही लेखाविभागाकडे पाठविल्याचे सुरक्षा विभागाकडून सांगितले जात असलेतरी याची अंमलबजावणी होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.यासंदर्भात केडीएमसीचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी वेतन दोन महिने मिळालेले नाही हे वास्तव असून त्यांच्या वेतनासंदर्भातील फाईल लेखाविभागाकडे पाठविली आहे. आपल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन देखील आताच झाले असून बोर्डाच्या सुरक्षारक्षकांचे वेतनपण लवकरच दिले जातील असे सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली