शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठामपात ‘एक’मताने महिलाराजच येणार

By admin | Updated: January 26, 2017 03:15 IST

ठाणे महानगरपालिकेच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुरु ष मतदारांची संख्या जास्त असली तरी निवडून येणाऱ्यांमध्ये

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुरु ष मतदारांची संख्या जास्त असली तरी निवडून येणाऱ्यांमध्ये मात्र महिलाच बाजी मारणार आहेत. पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने होत असलेल्या निवडणूक रचनेत एका महिलेला जास्त जागा मिळाली आहे. त्यामुळे महासभेत ६५ नगरसेवक, तर ६६ नगरसेविका असणार आहेत.ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी २४ जानेवारीला प्रसिद्ध झाली. यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण हे स्त्री मतदारांपेक्षा एक लाखाने अधिक आहे. असे असले तरी महापालिकेत मात्र एक नगरसेविका जास्तीची निवडून जाणार असल्याने महापालिकेत ‘महिलाराज’ येणार, हे निश्चित मानले जात आहे. ठाणे महापालिकेची यंदाची निवडणूक ही बहुसदस्यीय पॅनलची असल्याने येथून ३३ प्रभागांतून १३१ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. यामध्ये ६५ पुरुष आणि ६६ महिलांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत १२ लाख ३० हजार २६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरु ष मतदार ६ लाख ६८ हजार ८१६, तर स्त्री मतदारांची संख्या ५ लाख ६१ हजार १७८ एवढी आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत केवळ ३५ हजार ४२७ मतदारांची वाढ झालेली आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत द्विसदस्यीय पॅनल होते. त्या वेळेस ६५ नगरसेवक आणि ६५ नगरसेविका महापालिकेवर निवडून गेल्या होत्या. परंतु, यंदा हा रेशो एक टक्क्याने वाढला असून प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आणि आरक्षण सोडत निघाल्यावर एक जागा ही महिलेची वाढलेली आहे. असे जरी असले तरी पुरुष या महिलांना विविध प्रकारच्या विषय समित्या, स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळ आदींसह इतर समित्यांमध्ये कितपत स्थान देणार, ते येणारा काळच ठरवणार आहे. (प्रतिनिधी)