शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी बसवर कारवाईसाठी वेळ नाही, आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:00 IST

ठाणे पूर्वेतून सुटणा-या खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे.

ठाणे : ठाणे पूर्वेतून सुटणा-या खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे. महापालिकेने त्यांच्यावर कारवाईसाठी आरटीओकडे बोट दाखविले असतांना आता वाहतूक पोलिसांनीदेखील आरटीओलाच जबाबदार धरले आहे. असे असले तरी या बसना लगाम कोण घालणार असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.सहा महिन्यांपूर्वीदेखील समितीने कोपरी येथून होणाºया खाजगी बसच्या विरोधात आंदोलन उभारले होते. त्यानंतर त्या काही दिवसांसाठी का होईना बंद झाल्या होत्या. वाहतूक पोलीस आणि संबंधित आरटीओ प्रशासनानेदेखील यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज आठ महिने उलटून गेल्यानंतरही त्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही.कोपरीमध्ये आंदोलन झाल्यानंतर या बस बंद होतील असे वाटत होते. परंतु, आजही त्या सुसाट सुरूच आहेत. टीएमटीच्या बस थांब्यावर त्या उभ्या करू नका म्हणून परिवहनतर्फे कर्मचारी नेमले आहेत. तरी त्यांच्याशी हुज्जत घालून त्या थेट बसथांब्यावर उभ्या राहत आहेत.कॅडबरी ब्रीज, नितीन कंपनी आणि तीनहातनाक्याजवळील ब्रीजच्या चढणीवर आणि उताराला रस्त्याच्या मधोमध त्या उभ्या केल्या जात आहे. अचानक त्या उभ्या राहत असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.हायवेला सर्वच वाहने सुसाट असतात, परंतु अशा पद्धतीने कुठेही कसेही प्रवासी घेणे आणि उतरविणे यामुळे इतर वाहन चालकांबरोबर प्रवाशांचा जीवदेखील धोक्यात घालण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत आहे.दरम्यान, या बसेसवर कारवाई व्हावी म्हणून परिवहनच्या बैठकीत देखील चर्चा झाली होती. परंतु, आरटीओकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देऊन परिवहन प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचे अधिकारही त्यांनाच असल्याचे सांगितले होते. तरीही या प्रकरणात काहीच होताना दिसत नाही.