शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेत आताही विरोधी पक्ष नाही; चारही सभापती पदे वाटून घेत निवडणूक बिनविरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 20:55 IST

सेनेने दोन सभापती पदे स्वत:कडे ठेवत राष्ट्रवादीला एक आणि भाजपला एक सभापतीपद देऊन या जिल्हा परिषदेत दिलजमाई केली आहे. 

ठाणे : राज्याच्या राजकारणात विळ्या भोपळ्याचे नाते असलेल्या भाजपाला ठाणे जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीचे सभापतीपद देत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेत यावेळी विरोधी पक्ष ठेवलेला नसल्याचे आजच्या विषय समित्यांच्या निवडणुकीवरून उघड झाले. यावेळी सेनेने दोन सभापती पदे स्वत:कडे ठेवत राष्ट्रवादीला एक आणि भाजपला एक सभापतीपद देऊन या जिल्हा परिषदेत दिलजमाई केली आहे. 

सेनेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, बांधकाम, आरोग्य समिती सभापती पदी सेनेचे कुंदन पाटील आणि कृषी सभापती शहापूरचे राष्ट्रवादीचे  संजय निमसे आणि मुरबाडच्या नंदा उघडा यांना समाजकल्याण समिती सभापती पद प्राप्त झाले. त्या भाजपाच्या आहेत. विरोधी पक्षच न राहिल्या मुळे सभापती पदाची ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, यांनी कामकाज पाहिले.  

येथील गोयंका इंटरनॅशनल स्कुल येथे कोव्हिड १९ संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका गुरुवारी संपन्न झाल्या. विजयी उमेदवारांचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांनी अभिनंदन केले. महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी विराजमान झालेल्या रत्नप्रभा तारमळे ( शिवसेना)  या खारबाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.तर समाज कल्याण सभापती पदी विराजमान झालेल्या नंदा उघडा (,भाजपा) या वैशाखरे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आहेत. बांधकाम, आरोग्य  समिती सभापती पदी निवडून आलेले कुंदन पाटील ( शिवसेना) हे पूर्णा गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.तर संजय निमसे ( राष्ट्रवादी) हे चेरपोली गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.