शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जलवाहिनी दुरुस्तीला अखेर मुहूर्त, आज डोंबिवली पूर्वेत पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 02:57 IST

न्यू कल्याण रोडवरील बंदीश पॅलेस चौकातील गळती लागलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अखेर केडीएमसीला मुहूर्त मिळाला आहे.

डोंबिवली - न्यू कल्याण रोडवरील बंदीश पॅलेस चौकातील गळती लागलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अखेर केडीएमसीला मुहूर्त मिळाला आहे. पूर्वेकडील भागात पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिनीचे काम मंगळवारपासून सुरू केले जाणार आहे. या कामासाठी शटडाउन घेतला जाणार असल्याने डोंबिवली पूर्वेकडील भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे बुधवारीही पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.डोंबिवली पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाºया ११०० मिलिमीटरच्या या मुख्य जलवाहिनीला महिनाभरापासून गळती लागली आहे. परंतु, प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम न झाल्याने सातत्याने बाहेर पडणाºया पाण्यामुळे येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. जलवाहिनीची दुरुस्ती करण्याऐवजी खड्डे बुजवण्यासाठी पेव्हरब्लॉकने केलेली डागडुजीही कुचकामी ठरली आहे. खड्ड्यांची खोली पाहता त्यामुळे एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल वाहनचालकांकडून केला जात होता. पाण्याच्या नासाडीबाबत महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांना पत्र दिले होते. जलवाहिनीच्या गळतीमुळे रस्ता खचण्याचे प्रकार सुरू असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. आता मंगळवारपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे पूर्व भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारीही कमी दाबाने पुरवठा होणार असल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ट्रकच्या धडकेने जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तुटला होता. त्याच्या दुरुस्तीकामी पाणीपुरवठा विभागाला तीन ते चारवेळा शटडाउन घ्यावे लागले होते. त्यानंतरही गळती कायम होती. त्यामुळे मंगळवारच्या शटडाउनमध्ये गळतीची समस्या पूर्णपणे निकाली काढण्यात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना यश येते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.टिटवाळा, कल्याणमध्येही आज पाणी नाही१०० दलली क्षमतेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकामी मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा टिटवाळा, मांडा पूर्व-पश्चिम, उंबर्णी, बल्याणी, मोहिली, जेतवननगर व तिपन्नानगर टेकडी, गाळेगाव, गावठाण, गणेश कॉलनी, पंचशीलनगर, शास्त्रीनगर, फुलेनगर, यादवनगर, मोहनागाव, शहाडगाव, वडवली, अटाळी, आंबिवली तसेच कल्याण पश्चिममधील शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोकनगर, वालधुनी, शिवाजीनगर, जोशीबाग व कल्याण रेल्वेस्थानक परिसर या भागांमध्ये होणारा पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

टॅग्स :Waterपाणीdombivaliडोंबिवली