शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

पोस्को कायद्यातंर्गत किती दिवसांत FIR नोंदवावा,यासाठी वेळेचे बंधन नाही - मनिषा तुळपुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 19:20 IST

एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो.

कल्याण - एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो. त्यासाठी डाक्टरांचे मत महत्त्वाचे आहे. गुन्हा नोंदविण्यास उशीर का झाले याचे योग्य ते कारण द्यावे लागते. याउलट तीन महिन्यांपर्यंत गुन्हा नोंद करावा लागतो, असे मत अॅड. मनिषा तुळपुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, परिवर्तन महिला संस्था आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक अत्याचार प्रकरणी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, सामाजिक संस्था तसेच वकील यांची भूमिका व जबाबदारी’’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुळपुळे बोलत होत्या. समाजातील बालक-बालिका आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत  आहे.

त्याप्रमाणात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गुन्हेगारांना कठोर शासन होत नसल्याने प्रवृत्तीला आळा बसण्याऐवजी या प्रकारच्या गुन्ह्याची संख्या वाढत आहे. पोस्को कायदा व पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहे. त्यावर या परिसंवादात माहिती देण्यात आली.  तुळपुळे म्हणाल्या,  आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याच बरोबर पीडितांचे पुनर्वसन होणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये समुपदेशन ,वैद्यकीय उपचार, स्वत:च्या पायावर उभे करणे आणि शिक्षण या गोष्टी पुनर्वसनात येतात. बाल लैंगिक शोषणाबाबत संवेदनशीलता, खूप वेळ आणि एका चांगल्या टीमची गरज असते. 16 ते 18 हे वय आकर्षणाचे असते. मुलं आणि मुली प्रेमात पडल्यावर आर्थिक परिस्थिती, जात, धर्म या गोष्टी मध्ये येतात.

अशावेळी मुली घरी जात नाही. त्यांना बालसुधारगृहात ठेवा आणि 18 वर्षाची झाल्यावर निर्णय घेऊ द्या. पोक्सो कायद्यातंर्गत काही प्रश्न पडल्यास त्यांवर चर्चा व शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम झाले पाहिजेत. शाळेत मुला-मुलींना जबाबदार लैंगिक वर्तन शिकविले जात नाही. मुलं यापासून वंचित राहतात. एखाद्या व्यक्तींनी चुकीची तक्रार केली व ते सिध्द झाले तर त्या व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. अशी ओरड महिला आणि मुलांच्या बाबतीत वारंवार होत असते. आरोपी सज्ञान नसल्यास त्याने गुन्हा क्रिमिनल माईण्डने केला आहे का हे पाहिले जाते. चांगले जीवन जगण्याची संधी दिली जाते. समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण त्यांना दिले जाते, असे ही त्यांनी सांगितले.