शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मनीषाच्या कुटुंबीयांची विचारपूसही नाही, भाऊ मनोज निचिते यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 03:48 IST

शिवाजी चौकातील सदोष रस्त्यामुळे दुचाकीवरून पडून माझी सख्खी लहान बहीण मनीषा भोईर हिचा मृत्यू झाला. तिच्यावर घराचा डोलारा होता. तिच्या मृत्यूच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

 - मुरलीधर भवार कल्याण : शिवाजी चौकातील सदोष रस्त्यामुळे दुचाकीवरून पडून माझी सख्खी लहान बहीण मनीषा भोईर हिचा मृत्यू झाला. तिच्यावर घराचा डोलारा होता. तिच्या मृत्यूच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. आंदोलने तसेच रस्त्यांची पाहणी झाली. मात्र, मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी एकही व्यक्ती तिच्या घरी फिरकली नाही. यावरून आपली संवेदना किती मृत झाली आहे, असा सवाल भोईर यांचा भाऊ मनोज निचिते यांनी केला आहे.मनोज हा रिक्षा चालवून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मनीषाचा ७ जुलैला शिवाजी चौकात दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती तिचे पती धनाजी यांनी मनोजला दिली. ती ऐकून त्याला धक्का बसला. घटनास्थळी धाव घेत त्याने मनीषाला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.कल्याणच्या के.सी. गांधी विद्यालयात मनीषा शिपाई होत्या. त्याचबरोबर काही घरांमध्ये धुणीभांडीची कामे करत होत्या. ७ जुलैला सायंकाळी शाळा सुटली, तेव्हा पाऊस होता. त्या रस्त्याने जात असताना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना दुचाकीने घरी सोडतो, असे सांगितले. मनीषा त्याच्या गाडीवर बसल्या. १०० मीटर अंतरावर गाडी जात नाही, तोच शिवाजी चौकातील असमान रस्त्यावरून गाडी घसरून मनीषा खाली पडल्या. त्यांच्या अंगावरून शेजारून जाणारी बस गेली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.मनोजने सांगितले की, धनाजी हे कूक असून खडकपाड्यातील हॉटेलमध्ये काम करतात. त्यांना कायमस्वरूपी नोकरी नाही. मनीषाला तीन मुली व एक मुलगा आहे. मोठी मुलगी मयूरी (वय १९) ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दुसरी मुलगी माधुरी (वय १८) असून तिचे लग्न झालेले आहे. तिसरी मुलगी खुशबू (वय १६) हिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर, मुलगा सागर हा वाणी विद्यालयात सातवीत शिकत आहे. मनीषा काम करून मुलांना शिकवत होती. तिच्या मृत्यूमुळे भोईर कुटुंबाचा आधार हरपला आहे.मनीषाच्या अपघातप्रकरणी बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत आहे. आंदोलनेही झाली. अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नयेत, यासाठी आंदोलने केली जात असतील, तर चांगली बाब आहे. मात्र, मनीषाच्या घरी एकही राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी फिरकलेले नाहीत. मनीषाच्या कुटुंबाची कोणी साधी विचारपूस केली नाही. तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. शहरातील करदात्या नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत. रस्ते विकास महामंडळावर जबाबदारी ढकलली जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांत मनीषाच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार आहे का? की केवळ ही एक दुर्दैवी घटना आहे, असे बोलून अधिकारी व सगळेच वेळ मारून नेणार आहेत, असा प्रश्न मनोजने केला आहे.मदतीसाठी ठरावाची मागणी करावीकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सदस्या छाया वाघमारे यांनी मनीषा भोईरच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. त्यावर स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी या विषयी महासभेत ठराव करण्याची सगळ्यांनी मागणी करावी, अशी सूचना केली. 

टॅग्स :kalyanकल्याणnewsबातम्या