शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

ठाणे-कल्याण समांतर रस्त्याचा प्रस्तावच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 03:27 IST

जिल्हा प्रशासनाचे कानांवर हात : रेतीमाफियांच्या विरोधापुढे टाकली नांगी

सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : १५ वर्षांपूर्वी म्हणजे २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर ठाणे-कल्याण रेल्वेलाइनला समांतर रस्ता मंजूर झाला होता. परंतु, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाने तर असा काही प्रस्ताव आल्याचे ऐकिवातही नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा रस्ता बांधण्याची केवळ घोषणा केली गेली की, त्यांचे विस्मरण झाले, अशी चर्चा आहे. तर, भूमाफिया, रेतीमाफियांच्या विरोधामुळेच प्रशासन आणि राज्यकर्ते समांतर रस्त्याविषयी उदासीन असल्याचा आरोप दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील ताण या समांतर रस्त्यामुळे कमी होणार होते. तर, रेल्वेतील प्रवाशांना अडचणीच्या वेळी या रस्त्याने येजा करणे शक्य होणार होते. रेल्वेच्या संभाव्य अपघातप्रसंगी या समांतर रस्त्याने मदतीची वाहने रेल्वे अपघातस्थळी आणता यावी, अशा हेतूने समांतर रस्ता मंजूर झाला होता. तो नसल्याने १५ वर्षांपूर्वी पाण्यातून वाट काढत रेल्वेरुळांवरून चालण्याचा वाईट अनुभव महिला प्रवाशांनीही घेतला होता. या जीवघेण्या महाप्रलयाच्या वाईट अनुभवानंतर हा रेल्वेलाइनला समांतर रस्ता मंजूर झाला होता. काही कालावधीनंतर जिल्हा नियोजन व विकास समितीमध्ये हा विषय चर्चेला येऊन या रस्त्याला मान्यता मिळालेली होती. मात्र, या रस्त्याच्या कामाविषयी सध्या जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाने कानावर हात ठेवले आहेत.भूसंपादनाच्या हालचालीच नाहीया १८ किमीच्या समांतर रस्त्यासाठी भूसंपादन झालेले नाही. मध्यंतरी ठाकुर्ली ते पत्रीपुलापर्यंत रस्ता तयार झालेला आहे. याप्रमाणेच ठाकुर्ली ते डोंबिवली हा चार किमीचा रस्ता स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे रखडलेला आहे. त्यानंतर, पुढे ठाण्याच्या दिशेने तर काहीच झालेले नाही.एकमेकांकडे बोटठाणे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आजपर्यंत या समांतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव आलेला नाही. असा रस्ता प्रस्तावित नसल्याचे ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी सांगितले. तर, बांधकाम विभागाच्या नियंत्रणात हा समांतर रस्ता असल्याचा प्रस्ताव नाही. कदाचित एमएसआरडीसी, एमएमआरडीए किंवा ठाणे महापालिकेकडे तो प्रस्तावित असण्याची शक्यता येथील बांधकाम विभागाचे ज्येष्ठ अभियंता रणजित शिंगाडे यांनी सांगितले.भू आणि रेतीमाफियांना अभयठाणे पूर्वेतील कोळीवाडा येथील रेल्वे पुलाजवळून हा समांतर रस्ता ठाणे खाडी पार करून पुढे विटावा ब्रिज, वाशीकडे जाणाºया लोकलचा ट्रॅक ओलांडून पुढे नेणे अपेक्षित होते. कळवा स्टेशनजवळील मफतलाल कंपनीच्या कॉलनीजवळून गेलेल्या रस्त्याला तो जोडला जाऊ शकतो. पुढे खारेगाव फाटकाला लागून असलेल्या पश्चिमेच्या कळवा कारशेडजवळून तो पुढे नेणे शक्य आहे. अभिनेत्री नूतनच्या बंगल्याच्या डोंगराला वळसा घालून मुंब्रा रेतीबंदरकडून तो मुंब्रा स्टेशन, खाडी ओलांडून दिवा स्टेशन, कोपरपर्यंत करणे शक्य होते. परंतु, या कोपर खाडी, दिवा खाडी आणि मुंब्रा खाडीत माफियांकडून होणारे भराव आणि मनमानी रेतीउत्खनन करणाऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांच्या हितरक्षणार्थ समांतर रस्त्याचा प्रकल्प धूळखात ठेवण्यातच राज्यकर्त्यांनी धन्यता मानली.खाड्यांमधील रेती सक्शनपंपाद्वारे काढली जाते. या खाड्यांकडे जाण्यास रस्ता नसल्याने येथील भूमाफिया, रेतीमाफियांना पकडता येत नसल्याचा बहाणा पोलीस व प्रशासनाला करता येतो. समांतर रस्त्याच्या निर्मितीमुळे प्रशासनाला हा बहाणा करता येणार नाही, असे येथील जाणकार सांगत आहेत. या रेल्वेलाइनच्या आधीच्या चौथ्या ट्रॅकला लागून पाचवा व सहावा रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी गेल्या आठ वर्षांच्या दरम्यान दिवा ते ठाण्यापर्यंत रेल्वेने खाडीतील व नागरी वस्तीतील अतिक्रमणे तोडली.रेल्वेच्या या दोन ट्रॅकच्या विस्तारीकरणासाठी या परिसरात भूसंपादन करून कम्पाउंड घातले. परंतु, या ट्रॅकऐवजी समांतर रस्त्यासाठी या जागेचे भूसंपादन होत असल्याचा नागरिकांचा समज होता. मुंब्रा येथील दोन फलाट व कळवा येथील नवीन फलाट हे लोकलसाठी असल्याचे या समांतर रस्त्याच्या चाचपणीप्रसंगी लक्षात आले. यासाठी पाचव्या व सहाव्या ट्रॅकच्या विस्तारासाठी खाडीकिनाºयाचे कांदळवन नष्ट झाले आहे. मात्र, ठाणे ते कल्याण रेल्वेलाइनच्या समांतर या १८ किमीच्या रस्त्यासाठी १५ वर्षांत हालचाली केल्या नसल्यामुळे तो तयार झाला नाही.