शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दु:खात आम्हाला कोणीच वाली नाही; डोंबिवलीत पूरग्रस्तांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:33 IST

प्रशासनाची डोळेझाक होत असल्याची टीका

डोंबिवली : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस व आलेल्या पुरामुळे खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. डोंबिवली रिंगरूटच्या आराखड्यात असलेला परिसर पाण्याखाली होता. त्यात रविवारी बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने खाडीकिनारी भागात पूरसदृश परिस्थिती होती. पुराचा फटका बसलेल्या पश्चिमेतील नवीन देवीचा पाडा येथील रहिवाशांंनी मंगळवारी रस्त्यावर येत आम्हाला कोणी वाली नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात चाळी बांधण्यात आल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी किंमत घरे मिळाल्याने अनेकांनी ती खरेदी केली. खाडीकिनारी असलेल्या नवीन देवीचा पाडा, जगदंबा मंदिर, गरिबाचा वाडा, सरोवर नगर, जुनी डोंबिवली, कुंभारखाण पाडा परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचले. त्यातच बारवी धरणाचे पाणी वाढल्याने अनेकांच्या घरातील फर्निचर, टी. व्ही., गाद्या, कपडे, धान्य असे सर्व साहित्य भिजले. त्यामुळे नागरिकांनी सर्व सामान बाहेर टाकून दिले. सध्या तेथील पाणी ओसरले असले तरी घरांत चिखलाचे साम्राज्य आहेत. त्यामुळे आता राहायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.निवडणुकीत आमच्याकडे हक्काचे मतदार म्हणून पाहिले जात होते. त्यावेळी अनेक जण आमची विचारपूस करत होते. परंतु, आता कोणी काळजी घेत नाही, अशी खंत रहिवासी व्यक्त करत आहेत. सरकारही आमच्या समस्येकडे कानाडोळा करत आहेत. आम्ही उद्ध्वस्त झालो आहेत. आम्हाला कोणीच वाली नाही, अशी टीका ते करत आहेत. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी कायदा मोडून बांधकामे केली त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही रहिवासी करत आहेत.प्रत्यक्षात पश्चिमेतील बहुतांश ठिकाणच्या पूरग्रस्तांची स्थानिक नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, भाजपचे गटनेते नगरसेवक विकास म्हात्रे, महापालिका विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, नगरसेवक वामन म्हात्रे आदींनी आपापल्या प्रभागांत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. परंतु, ही सुविधा तोकडी असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिकेने ठोस पावले उचलावीत, असे मत रहिवासी व्यक्त करत आहेत.चाळींमधील घरात चिखल झाला असून, त्याची स्वच्छता करणे, फवारणी करणे, साथीचे आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करून वैद्यकीय आरोग्य शिबिरे भरवण्याची गरज व्यक्त होत आहे.म्हशी गेल्या पण शेणामुळे दुर्गंधीकल्याण येथील गोविंदवाडी बायपास रस्त्यावर परिसरातील गोठ्यांमधील म्हशी सुरक्षिततचेच्या कारणास्तव निवाºयासाठी आणल्या होत्या. पूरस्थिती कमी होताच त्यांना पुन्हा गोठ्यांमध्ये नेण्यात आले. परंतु, त्यामुळे मात्र त्या रस्त्यावर प्रचंड घाण झाली होती.शेण-मूत्र आदींमुळे दुर्गंधी पसरलेली होती. वाहनचालक, पादचारी, रहिवासी आदींच्या आरोग्याचा त्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतो.त्यासंदर्भात महापालिकेचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी म्हणाले की, तेथेही स्वच्छता केली जाईल. बहुतांशी काम झाले आहेत, उर्वरित पूर्ण केले जाणार आहे.पूरग्रस्त घरातील खराब झालेल्या वस्तू रस्त्यावर आणून टाकत आहेत. ते उचलण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत. तसेच जंतुनाशक पावडर फवारणी, धुरफवारणी अशीही कामेही केली जात आहेत.- विलास जोशी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी.