शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उता-यासाठी आता तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 15:15 IST

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर बसवण्यात आलेल्या ऑनलाईन सातबारा किऑस्क मशीनचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला

ठाणे, दि. 15 -स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर बसवण्यात आलेल्या ऑनलाईन सातबारा किऑस्क मशीनचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. त्याद्वारे पहिल्या टप्यात जिल्ह्यातील 101 गावांच्या सातबा-याचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे शेतक-यांना ते आता ऑनलाईन मिळवता येणार आहे. त्यासाठी शेतक-यांना आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. गावात बसवलेल्या मशीनद्वारे सातबारा उतारा घेता येणार आहे. 

डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 101गावांचा सात बारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना  दिली. जिल्ह्यातील 1001 गावांपैकी पहिल्या टप्प्यात 101 गावांचे संगणकीकरणाचे कामपूर्ण झाली आहे. सातबारा संगणकीकरणात उल्हासनगर तालुका आघाडीवर आहे. या 101 गावांत सात बाराचे किऑस्क मशीन डिजिटल स्वाक्षरीसह नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

सीएसआरच्या माध्यमातून आजपासून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयांमध्ये ही मशीन्स बसवण्याची कार्यवाही सुरू  झाली आहे. आता या मशीनमुळे राज्यातील ऑनलाईन नेटवर्कमधील कुठलाही सात बारा काढणे शक्य होणार आहे. आता सातबा-यासाठी तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्ह्यात एकंदर  44 ठिकाणी ही मशीन्स बसवण्यास सुरुवात होणार आहे. या ऑनलाईन सातबारा शुभारंभ प्रसंगी आजच्या शुभारंभ प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते