शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा उत्पन्नावर परिणाम नाही; अधिकाऱ्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:05 IST

दलालांची संख्या घटल्याने शुकशुकाट; नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकारी तैनात

ठाणे : कर्मचाºयांचा आकृतीबंध पूर्ण करावा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने शुक्रवारी राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन केले. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात कर्मचाºयांनी निदर्शने केली. तर, आंदोलनामुळे आरटीओच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. येणाºया नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही अधिकारी तैनात केल्याचे आरटीओ अधिकाºयांनी सांगितले. मात्र, येथे दिसणारा दलालांचा दररोजचा वावर शुक्रवारच्या आंदोलनामुळे कमी झाल्याने कार्यालयासह आजूबाजूच्या परिसरात शुकशुकाट पाहण्यास मिळाला.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत एकूण चार उपप्रादेशिक कार्यालये आहेत. तेथील वेगवेगळ्या १० विभागांत सुमारे ३०० ते ३५० कर्मचारी आहेत. त्यांनी शुक्रवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठीही निदर्शने केली. मोटार वाहन विभागातील कर्मचाºयांचा कर्मचारी आकृतीबंद व कार्यालयीन रचना या समान महत्त्वाच्या अनेक मागण्या प्रशासनस्तरावर अकारण प्रलंबित आहेत. परिवहन विभागातील वर्ग-३ कर्मचाºयांच्या भवितव्यास त्यामुळे मोठा धोका उत्पन्न झाला आहे. त्यात मोटार वाहन विभागातील कर्मचाºयांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणेच रेटण्याचा प्रयत्न शासनाने सुरू केला. त्याच्या विरोधात शुक्र वारी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या वतीने लेखणीबंद आंदोलन केले.ऑनलाइनमुळे फटका नाहीआरटीओचा बºयापैकी कारभार हा आॅनलाइन सुरू झालेला आहे. या लेखणीबंद आंदोलनामुळे आरटीओच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही.पण, वाहन हस्तांतरण पेपर आणि परवान्यांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी चार अधिकारी नेमले होते, अशी माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.चौघांना केले होते तैनातवाहन हस्तांतरणाची कागदपत्रे आणि परवाना यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोर आणि मर्फी येथील आरटीओ कार्यालयात प्रत्येकी दोनदोन अधिकारी तैनात केले होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसthaneठाणेStrikeसंप