शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी समितीला प्रशासनाचे सहकार्य नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:38 IST

सदस्यांचा आरोप : आठ कोटींची शिल्पे गायब. महासभेत चौकशीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे प्रशासन उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला.

ठाणे : थीम पार्कच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या लोकप्रतिनिधींच्या समितीला प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत समिती सदस्यांनी केला. प्रशासन सहकार्यच करणार नसेल, तर सभागृह निर्णय घेण्यास सक्षम असल्याचा इशारा यावेळी सदस्यांनी दिला. आचारसंहिता लागण्यापूर्वी थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे उपलब्ध करून तसा लेखी अहवाल सभागृहाला सादर करण्याची मागणी सदस्यांनी केली.

महासभेत चौकशीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे प्रशासन उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. गुरुवारी संध्याकाळी थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कची पाहणी केली असून दोन्ही कामांमध्ये ठेकेदाराने महापालिकेची कशा प्रकारे फसवणूक केली आहे, याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.ठेकेदाराच्या खात्याची माहिती गुलदस्त्यातपालिकेने बॉलीवूड पार्कमधील ज्या शिल्पांसाठी वर्षभरापूर्वी आठ कोटी रु पये मोजले आहेत, ती शिल्पे या पार्कमध्ये नसल्याचीच माहिती या दौऱ्यात उघड झाली. त्याशिवाय, हे पार्कआहे की, ठेकेदाराच्या कंपनीच्या भंगार सामानासाठी तयार केलेले डम्पिंग ग्राउंड आहे, असा प्रश्नही चौकशी समितीच्या सदस्यांनी केला.या दोन्ही पार्कची चौकशी करणाºया समितीला प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत नसून ठेकेदाराच्या बँक खात्यातून कोणाला चेक दिले, याची माहितीदेखील प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली नाही. याशिवाय, प्रशासनाने नेमलेल्या सदस्यांनीदेखील लोकप्रतिनिधींच्या सदस्यांची भेट घेतली नसल्याचे मुल्ला यांनी सांगितले.चौकशी समितीचे सदस्य आक्र मक झाल्याने अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधित अधिकाºयांना सूचना देण्यात येणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली.जे.जे. स्कूलच्या समितीतही गैरव्यवहार?थीम पार्कमध्ये उभारलेल्या शिल्पांची जी किंमत जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या समितीने नोंदवली आहे, त्यातसुद्धा गैरव्यवहार झालेला आहे की काय, असा संशय येथील कामे बघितल्यानंतर बळावत असल्याचे नजीब मुल्ला यांनी महासभेत सांगितले. थीम पार्कची कामे निविदेतील अटीशर्र्तीनुसार झालेलीच नसून कामासाठी वापरलेले साहित्य दुय्यम दर्जाचे असल्याने वर्षभरातच त्यांची प्रचंड वाताहत झालेली आहे. आणखी एखाद्या पावसाळ्यानंतर हे पार्क उजाड होऊन संपूर्ण खर्च पाण्यात जाईल, अशी भीतीही या सदस्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका