शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

By अजित मांडके | Updated: December 3, 2022 16:37 IST

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठाणे : राज्यात होत असलेला विकास विरोधकांना पचत नसल्यानेच सरकारवर आणि माझ्यावर टीका टीका करण्याची स्पर्धा लागली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांना टीका करायची असेल तर त्यांनी टीका करत राहावी या सर्वाना विकासकामानेच उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष अभियान घेण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. उद्योग बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र एखादा मोठा उद्योग हा एका महिन्यात बाहेर जात नसतो मात्र सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे कारण एकनाथ शिंदे हा पहाटे पर्यंत काम करतो म्हणून.  या आरोपांना मी कामाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आला काय गेला काय ही कोणाला चिंता नसते. मात्र नागरिकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी झोपतो कधी यांची चिंता विरोधकांनी करू नये असेही त्यांनी सांगितले. 

कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि ते सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे असतील. सिंचनाच्या बंद पडलेल्या १६ योजना सुरु केल्या आहेत. उदयोग क्षेत्रात २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे , त्यामुळेच राज्याचा विकास होत असल्याने त्यांना हा विकास पचत नसल्यानेच माझ्यावर टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई आणि ठाणे खड्डेमुक्त करण्याचेही त्यांनी जाहीर केले.  धाडसी निर्णय घेणारा होतो म्हणून मोदी,शहा यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची संधी

मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता सर्वाना होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मला संधी दिली मी  मी धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेणारा व्यक्ती होती हे त्यांनी ओळखले होते म्हणून. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे  सांगत बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.         

ठाण्यात येणाऱ्या आयुक्तांची  पुढची दलाने उघडी होतात

ठाणे महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी नवी मुंबईत माझी अपेक्षा पूर्ण केली. म्हणून त्यांना ठाण्याची जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील राज्याच्या महत्वाचा उद्योग विभाग एमआयडीसी देण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात जे आयुक्त म्ह्णून येतात त्यांची पुढची दालने उघडी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार