शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-कसारा मार्गावर वाढीव लोकलफेऱ्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:28 IST

अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती : आजचे आंदोलन स्थगित

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील तिसºया रेल्वेमार्गिकेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असले, तरीही त्या मार्गाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तोपर्यंत त्या मार्गावर एकही नवी लोकलफेरी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सहवाणिज्य अधिकारी रॉबिन कालिया यांनी गुरुवारी दिले. अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर उद्या (शुक्रवारी) करण्यात येणारे आंदोलन प्रवासी संघटनेने स्थगित केले.

कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या प्रवासी संघटनेच्या पदाधिकाºयांसमवेत बुधवारी मुंबई रेल्वे अधिकाºयांची बैठक झाली. दि. १ मार्च रोजी करण्यात येणारे आंदोलन संघटनेने मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच त्यानिमित्ताने प्रवासी संघटनेने केलेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिचालन विभागाचे अधिकारी शिवाजी सुतार हेही उपस्थित होते. कल्याण-कसारा मार्गावर तांत्रिक मुद्यांमुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. एमआरव्हीसीकडे त्या लाइनचे काम असून संघटनांनी त्यांच्याकडेही पाठपुरावा करावा, असे आवाहन सुतार यांनी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र विशे यांनी सांगितले. संघटनेच्या सल्लागार अनिता झोपे, प्रसिद्धिप्रमुख शैलेश राऊत यांच्यासमवेत अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

आसनगाव स्थानकातील जुन्या पादचारी पुलाची डागडुजी अलीकडेच करण्यात आली असली, तरी त्यात तांत्रिक चुका झाल्याकडे विशे यांनी लक्ष वेधले. त्यावर अधिकाºयांनी सांगितले की, पुलाच्या कामामध्ये काही चुका नाहीत, पण पूर्वेकडील भागामध्ये लँडिंगदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या असून त्याची पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे. तसेच स्थानकात मुंबई दिशेकडे आणखी एक नवा पादचारी पूल बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून त्यासंदर्भातही काही सूचना असतील, तर त्या सांगाव्यात. त्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आसनगाव स्थानकातून कल्याण व मुंबईच्या दिशेने जाणाºया लोकलफेºयांच्या वेळा सुधाराव्यात, गर्दीच्यावेळी काही लोकलफेºया द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली. त्यावर अभ्यास सुरू असून आगामी काळात गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. लोकलची वेळ बदलण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक असून लवकरच बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. याच मार्गावरील टिटवाळा, खडवली, आंबिवली, कसारा, खर्डी स्थानकांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातही चर्चा झाली. स्थानकांमधील पाणपोया, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेºयांची गरज आदी बाबींवर चर्चा झाली. प्रवाशांनीही सतर्क राहावे, स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे व त्यासाठी प्रवासी संघटनेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. या चर्चेअंती शुक्रवारी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आले.उंबरमाळी, तानशेत थांब्यांना स्थानकाचा दर्जा देण्यात आल्यानंतरही त्या स्थानकांमध्ये सोयीसुविधा मात्र देण्यात आलेल्या नाहीत. त्यातच एका रेल्वे तिकीट तपासनिसाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाला, ही गंभीर बाब असल्याचे प्रवासी संघटनेने निदर्शनास आणले. त्या ठिकाणची बहुतांश कामे मे २०१९ पर्यंत पूर्ण केली जातील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केल्याचे विशे यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने ही कामे पूर्ण करावीत अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. वरील दोन्ही स्थानकांवर तातडीने सुविधा द्याव्यात अशी मागणीही केली आहे.