शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

...मग हॉकर्स झोन कशासाठी?

By admin | Updated: September 8, 2016 02:30 IST

गणेशोत्सव कालावधीत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई शिथिल करा, या महापौरांच्या निर्णयाचे स्वागत करताना फेरीवाला क्षेत्रात यापुढे कारवाई करू नये,

कल्याण : गणेशोत्सव कालावधीत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई शिथिल करा, या महापौरांच्या निर्णयाचे स्वागत करताना फेरीवाला क्षेत्रात यापुढे कारवाई करू नये, अशी मागणी फेरीवाला संघर्ष समितीने केली आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत ना-फेरीवाला आणि फेरीवाला क्षेत्र ठरवले असून याला केडीएमसीच्या महासभेची मंजुरी आहे. याबाबत, ठराव होऊनही फेरीवाला क्षेत्रात सुरू असलेली कारवाई चुकीची असून महापौर आणि नगरसेवकांना ‘त्या’ठरावाचा विसर पडला का, असा सवाल समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात उघडलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाला संघटनांनी मागील आठवड्यात महापालिकेवर मोर्चे काढले होते. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याबरोबरच फेरीवाला क्षेत्रातील कारवाई थांबवा, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी एक परिपत्रक काढून गणेशोत्सव काळात फेरीवाल्यांविरोधातील कारवाई शिथिल करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या आदेशामुळे फेरीवाल्यांना एकप्रकारे बाप्पा पावला आहे. दरम्यान, स्कायवॉक आणि रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी तसेच वाहतूककोंडी होणाऱ्या ठिकाणी कारवाई सुरूच ठेवावी, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापौरांच्या निर्णयाचे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत माळी यांनी स्वागत केले. तर, दुसरीकडे समितीचे अध्यक्ष मोरे यांनी मात्र फेरीवाला क्षेत्रात सुरू असलेली कारवाई थांबवावी, असे म्हटले आहे. २०१५ च्या महासभेत फेरीवाला धोरणाला मान्यता देण्यात आली असून यात फेरीवाला आणि ना-फेरीवाला क्षेत्रही ठरवण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. स्कायवॉकवर तसेच रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यांवर कारवाईला आमचा विरोध नाही. परंतु, फेरीवाला क्षेत्रातही सुरू असलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे मोरे म्हणाले. गणेशोत्सवाच्या धर्तीवर महापौरांनी दिलासा दिला असला तरी यापुढे फेरीवाला क्षेत्रात कारवाई होणार नाही, याचीही दखल त्यांनी घ्यावी, अशी मागणी त्यांची आहे. (प्रतिनिधी)डोंबिवली फेरीवाला क्षेत्र : टिळक रोड (फडके रोड ते नेहरू रोड) टपाल कार्यालयासमोरील एक बाजू , फडके रोड (मदन ठाकरे चौक ते गणेश मंदिर रोड), सावरकर रोड (नेहरू रोड ते फडके रोड), टिळक रोड (मदन ठाकरे चौक ते फडके रोड ते ताई पिंगळे चौक सर्वेश सभागृहापर्यंत) सूतिकागृहासमोरील बाजू , टाटा लाइन रोड (मॉडर्न प्राइडसमोरची बाजू) मानपाडा रोड ते स्टेट बँक, टिळक रोड (ताई पिंगळे चौक ते पारसमणी सर्कल) एक बाजू , ठाकुर्लीतील विजय चौधरींच्या घरापासून महिला समिती, बंदिश पॅलेस ते महिला समिती विद्यालयाची मागील बाजू, कोपर रोड स्थानकाकडे, जुनी डोंबिवली रोड (देवी चौक ते जुना डोंबिवली रिक्षा स्टॅण्ड), पंडित दीनदयाळ रोड (सम्राट हॉटेल ते रेतीबंदर क्रॉस रोड), गुप्ते रोड (कर्वे रोड ते नाना शंकर शेठ रोड), सुभाष रोड (चिंचोड्याचापाडा ते कुंभारखाणपाडा), रेतीबंदर रोड (जुना ह प्रभागक्षेत्र कार्यालय ते खाडी) रेल्वे स्थानक ते इंदिरा गांधी चौक (पाटकर रोड), रेल्वे स्थानक ते फतेहअली रोड (जगदीश बँकवेट सभागृह), चिमणीगल्ली, मोठी गल्ली, पाटकर चौक ते मदन ठाकरे चौक आणि फडके रोड, फतेहअली रोड भगतसिंग रोड (नेहरू रोड ते ताई पिंगळे चौक), आगरकर रोड, नेहरू रोडपासून भगतसिंग रोडपर्यंत, नेहरू रोड ते फडके रोड, इंदिरा गांधी चौक ते जमातखाना, मानपाडा रोड, ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते तुषार बंगल्यापर्यंत व पुढे चौधरी बिल्डिंगपर्यंत, विजय चौधरी बिल्डिंग ते रिद्धीमार्ग सोसायटी (ठाकुर्ली), कोपर रोड(रेल्वे स्थानक ते कोपर पूल), जुनी डोंबिवली रोड (आरबीओ ते देवी चौक),पंडित दीनदयाळ रोड (द्वारका हॉटेल ते सम्राट हॉटेल), गुप्ते रोड (रेल्वे स्थानक ते रेतीबंदर क्रॉस रोड), सुभाष रोड (क्रांती डिपार्टमेंट स्टोअर्स ते कुंभारखाणपाडा), महात्मा फुले रोड (रेल्वे स्थानक ते रेतीबंदर रोड), महात्मा गांधी रोड (आरबीओबी ते महात्मा गांधी उद्यान)कल्याणमधील ना-फेरीवाला क्षेत्र : कल्याण स्थानक शिवाजी चौक, सहजानंद चौक ते दुर्गाडी नाक्यापर्यंत, गुरुदेव हॉटेल बाजूच्या दोन्ही गल्ल्या (ओक बाग), वल्लीपीर रोड ते भानू सागर टॉकिजपर्यंत, पुष्पराज हॉटेल (महंमद अली चौक) ते महात्मा फुले चौकपर्यंत, शिवाजी चौक ते अन्सारी चौक, शिवाजी पथ ओकबागमार्गे आर्चिस गॅलरी ते वल्लीपीर रोडपर्यंत, आग्रारोडवरील शिवाजी चौक ते संत रोहिदासमार्ग आदर्श आॅप्टीशियनपर्यंत, संतोषीमाता रोड सहजानंद चौक ते एचडीएफसी बँकेपर्यंत