शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

‘...तर माेरे यांच्यासाेबतचा संबंध संपेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 5:31 PM

भिवंडीतील अजयनगर येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षातील सध्याच्या घडामाेडी व त्यामुळे शिवसैनिकांत संभ्रम निर्माण झाल्याने प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक पार पडली.

लोनाड : भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचा अद्याप संपर्क झालेला नाही. त्यामुळे ते परत आल्याशिवाय त्यांची भूमिका समजणार नाही. ते शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे निवडून आलेले आहेत. त्यामुळे आमच्याजवळचे असले तरी पक्ष साेडून गेले तर त्यांचा आमच्याशी काहीही संबंध राहणार नाही, असा इशारा शिवसेनाठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी रविवारी दिला. भिवंडीतील अजयनगर येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षातील सध्याच्या घडामाेडी व त्यामुळे शिवसैनिकांत संभ्रम निर्माण झाल्याने प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक पार पडली. शिवसेनेकडून आपल्याला काेणत्याही पदाची अपेक्षा नाही. आपला शेवटचा श्वास शिवसेनेच्या भगव्यासोबत राहील. पक्षाबाबतचा अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख घेतील. त्याबाबत सर्व शिवसैनिकांना समजेलच, ताेपर्यंत शिवसैनिकांनी विचलित होऊ नये, असेही पाटील म्हणाले. 

या वेळी शिंदे समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅनर काढण्याची मागणी केली. त्या वेळी ते बॅनर काढण्याच्या सूचना तालुकाप्रमुख विश्वास थळे यांनी दिल्या. तसेच एकनाथ शिंदे, शांताराम माेरे यांच्याविराेधात जाेरदार घाेषणा देण्यात आल्या.

बैठकीला जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे, महिला जिल्हा संघटक कविता भगत, तालुकाप्रमुख विश्वास थळे, माजी तालुकाप्रमुख तुळशीराम पाटील, कृष्णा वाकडे, रविकांत पाटील, अनंता पाटील, गोकुळ नाईक, प्रकाश तेलिवरे, पंचायत समितीच्या सभापती ललिता जोशी, विद्या थळे, फशीबाई पाटील, कल्पना भोईर, युवासेनेचे राजू चौधरी, तालुका सचिव जय भगत, राजेंद्र काबडी, तालुक्यातील उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेनाभवनावरून येणारी भूमिकाच अंतिम’सेनाभवनावरून जी भूमिका जाहीर हाेईल, तीच अंतिम असते. त्यामुळे पदाधिकारी वैयक्तिक मत मांडू शकत नाही. त्याच्यासाठी पक्षाचा आदेश अंतिम असतो, असेही पाटील यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सहकार्य करू या, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे