शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...तर प्रकल्पांचे अनुदान बंद; नगरविकासची स्थानिक संस्थांना ताकीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 06:10 IST

ठाणे : मालकीची जागा अथवा भूसंपादन झालेले नसतानाही विविध विकास प्रकल्प राबवण्याच्या राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या ...

ठाणे : मालकीची जागा अथवा भूसंपादन झालेले नसतानाही विविध विकास प्रकल्प राबवण्याच्या राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या मनमानीस आता नगरविकास विभागाने वेसण घातली आहे.

पाणीपुरवठा, मलनि:सारण, जलशुद्धीकरण प्रकल्पांसह रस्ते प्रकल्पांसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध नसेल, तर शासनाचे कोणतेही अनुदान मिळणार नाही, अशी ताकीद आता नगरविकास विभागाने दिली आहे. यामध्ये जेएनएनयूआरएमसह अमृत योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थानासह राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या आणि भविष्यात राबवण्यात येणाºया विविध विकास प्रकल्पांचा समावेश आहे.

राज्यातील २७ महापालिकांसह सव्वादोनशेहून अधिक नगरपालिकांना याचा प्रामुख्याने फटका बसणार आहे. कारण, राज्यातील अनेक महापालिकांसह नगरपालिकांना अमृत योजनेसह सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत कोट्यवधींचे अनुदान मंजूर झालेले आहे.

त्यातून काही ठिकाणी प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. तर काही ठिकाणी सुरू झालेली कामे जागा उपलब्ध नसल्याने किंवा संपादित झालेली नसल्याने ती रखडलेली आहे. ही बाब शासनस्तरावरील आढावा बैठकीत वारंवार निदर्शनास आल्यानंतर नगरविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.या महापालिकांना फटका ठाणे महापालिकेच्या मुंब्रा-कळव्यातील मलनि:सारण योजना, वसई-विरारसह मीरा-भार्इंदरचा पाणीपुरवठा प्रकल्प, कल्याण-डोंबिवलीतील मलवाहिन्यांचा प्रकल्प, नवी मुंबई महापालिकेचे शुद्धीकरण केलेले पाणीवितरण प्रकल्प यांना नगरविकासच्या या निर्णयाचा फटका बसण्याची भीती आहे.