शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

...तर कसाऱ्याचे होईल माळीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:52 IST

दरड कोसळल्याने घराचे झाले नुकसान : सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला

कसारा : शहापूर तालुक्यातील मोखावणे-कसारा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या पंचशीलनगर येथील सुनील शिंदे यांच्या घरावर दरड कोसळल्याने संपूर्ण घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील सर्वजण वेळेत बाहेर पळाले म्हणून सुखरूप वाचले.

सतत कोसळणाºया पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात व रेल्वे घाटात दरड कोसळल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी पंचशीलनगर येथील शिंदे यांच्या घरावर दरड व मातीचा मलबा कोसळल्याने त्यांच्या घरातील सर्व वस्तू मातीखाली गाडल्या गेल्याने शिंदे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील गॅस, अन्नधान्य, शालेय साहित्य, लॅपटॉपसह महत्त्वाच्या वस्तूंची नासधूस झाली आहे. या घटनेची दखल घेत तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. हा अहवाल सरकारकडे पाठवला आहे.

कसारा गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील आनंदनगर, पंचशीलनगर, देऊळवाडी, निंगडवाडी, ठाकूरवाडी, कोळीपाडा, तानाजीनगर या ठिकाणी डोंगर पोखरून नव्याने घरे उभी राहिली आहेत. डोंगर कमकुवत झाल्याने भविष्यात अतिवृष्टीमुळे कसाºयाचे माळीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तहसीलदार बावीस्कर यांनी वनजमिनीवर उभ्या राहिलेल्या धोकादायक घरांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली. कसारा-मोखावणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत मार्केयांनी अतिक्र मण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, कसाºयाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी नियोजनाचा अभाव आहे. यामुळे प्रशासनाने नियोजन करावे अशी मागणी होत आहे.घरावर जेव्हा दोन दगड पडले, तेव्हा माझ्या मुलाने मला सांगितले की, घरावर कोणीतरी दगड फेकतोय. तेव्हा पाऊस पडत होता. मी घरामागे बघितले, तर माती खाली येत होती. क्षणाचा विलंब न लावता मी घरातील सर्व मंडळींना घराबाहेर काढले व काही समजण्याअगोदर घरावर दरड कोसळली.- सुनील शिंदे, पीडितकसारा परिसरातील काही ठिकाणी भूस्खलन होऊन डोंगर खचत थेट घरावर पडत आहेत. अजून मोठ्या प्रमाणावर डोंगर खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल विभागाकडून धोकादायक घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या असून वनविभागाशी पत्रव्यवहार केला आहे.- रवींद्र बावीस्कर, तहसीलदार