शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

... तर हॉस्पिटल होणार सील, ठाणे महापालिकेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:44 IST

फायर ऑडिटसाठी महिन्याची मुदत : ठाणे महापालिकेचा इशारा

अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. यानुसार मंगळवारपासून शहरातील ३४७ खासगी आणि २७ शासकीय रुग्णालयांची झाडाझडती सुरू झाली आहे. या रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणा सक्षम आहे का? फायर ऑडिट केले आहे का? याची पाहणी केली जाणार आहे. ते केले नसल्यास पुढील ३० दिवसांत ते करून त्याचा अहवाल सादर करावा, असेही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बजावले आहे. तसे न केल्यास हॉस्पिटलच सील करण्यास त्यांनी अग्निशमन विभागास सांगितले आहे.

भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर सोमवारी आयुक्तांनी अग्निशमन विभागाची बैठक घेऊन हे आदेश दिले आहेत. त्यानुसार अग्निशमन विभागाने प्रत्येक अग्निशमन केंद्रांतर्गत चार ते पाच टीम तयार केल्या आहेत.  वागळे, बाळकुम, मुंब्रा, जवाहरबाग, पाचपाखाडी, कोपरी अशा अग्निशमन केंद्रांच्या माध्यमातून ही पाहणी केली जाणार आहे. अग्निशमन विभागाचे कर्मचारी, अधिकारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या पाहणीत त्या ठिकाणची अग्निरोधक यंत्रणा सक्षम आहे का?, फायर फायटिंग सिस्टीम, फायर एक्सटेन्शन, वाळूच्या बादल्या, स्मोक डिक्टेटर, स्प्रिंल्कर सिस्टीम, एक्झॉस्ट फॅन या कार्यान्वित आहेत किंवा नाहीत, याची पाहणी केली जाणार आहे.

कळवा, जिल्हा रुग्णालयाचीही होणार झाडाझडतीठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत खासगी रुग्णालयांसोबतच शहरातील महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यासह जी काही छोटी, मोठी अशी २७ रुग्णालये आहेत, त्यांचीही झाडाझडती केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. त्यामुळे महापालिकेची छोटी रुग्णालये किती सक्षम आहेत, याचीही माहिती पुढे येणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहरात मंगळवारपासून ही पाहणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार संबंधित रुग्णालयांनी पुढील ३० दिवसांत अहवाल सादर करावा; अन्यथा ती सील केली जाणार आहेत.- गिरीश झळके, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपा

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका