शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

...तर डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली छोटी राज्ये निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:43 IST

कल्याण: देशाच्या विकासासाठी छोटया छोटया राज्यांची निर्मिती झाली पाहीजे अशी संकल्पना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर आम्ही विदर्भ, मराठवाडासह कोकण आणि खानदेश अशा चार छोटया राज्यांची निर्मिती करू असे प्रतिपादन बसपा नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश साखरे यांनी रविवारी कल्याणात केले.छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत रोहीदास ...

ठळक मुद्देबसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचे प्रतिपादन

कल्याण: देशाच्या विकासासाठी छोटया छोटया राज्यांची निर्मिती झाली पाहीजे अशी संकल्पना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर आम्ही विदर्भ, मराठवाडासह कोकण आणि खानदेश अशा चार छोटया राज्यांची निर्मिती करू असे प्रतिपादन बसपा नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश साखरे यांनी रविवारी कल्याणात केले.छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत रोहीदास महाराज, गाडगे महाराज आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून कल्याणमधील गिरीजा सभागृहात बसपाच्या वतीने कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे संमेलन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून साखरे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर प्रदेश महाप्रभारी प्रा. नामदेव खंदारे, महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव दयानंद किरतकर, सुनिल खांबे आणि अशोक सिंग आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साखरे पुढे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजप सरकार हे पुरते अपयशी ठरले आहे. सत्तेत येण्याआधी विदर्भ वेगळा करण्याची भाषा करणारी भाजपा सत्तेत आल्यावर गप्प का? असा सवाल त्यांनी केला. राज्यात शेतकरी कर्जबाजरी झाल्याने आत्महत्या करत असताना आता मंत्रालयातही आत्महत्या होताना दिसतात. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण केलेली नाहीत. देशात भ्रष्टाचार होत असल्याचे कारण पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी नोटबंदी केली. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला मात्र भाजपाच्या नेत्यांवर नोटाबंदीचा काहीही परिमाण झाला नाही. भारत देशात सर्वात जास्त जीएसटी लागू केली आहे. नोटाबंदी ते जीएसटी या काळात महाराष्ट्रात खूप उद्योगधंदे बंद पडल्याने परिणामी बेरोजगारी वाढली. म्हणून हे सरकार पुर्णत: अपयशी ठरल्याचे साखरे म्हणाले. भाजप सरकार खोटे बोलते. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला ४ वर्षे झाली मात्र अद्याप नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रु पये जमा झाले नसल्याकडे साखरे यांनी लक्ष वेधले. आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात जिल्हानिहाय कार्यकर्ता मेळावा घेत असतो. आमचे संघटन विधानसभा क्षेत्रात मजबूत झाले आहे. महाराष्ट्रात भाईचारा कमीटी स्थापन करून सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही राज्यात काम करणार आहोत. तसेच राज्यात ओबीसी मेळावे आणि परिषदा घेणार आहोत असेही साखरे म्हणाले. तर नविनर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचे संघटन कौशल्य फार चांगले असल्याने आता आमचा विश्वास वाढला आहे. येणा-या निवडणुकीत बहुजन पार्टीचे विधानसभेत आणी लोकसभेत मोठया संख्येने सदस्य असतील असा विश्वास प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी