शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांची होणार उचलबांगडी; नाना पटोले यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:26 IST

नाना पटोले यांचा इशारा : ठाणे जिल्ह्यात पक्ष कमकुवत

अजित मांडकेठाणे  : ठाणे  जिल्ह्यात काँग्रेस पूर्णपणे कमकुवत झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा, लोकसभा अथवा महापालिकांच्या निवडणुका लढवायच्या असतील तर सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. याची जबाबदारी तेथील अध्यक्षांवर असणार आहे. परंतु, त्यांच्याकडून काम योग्य झाले नाही, तर त्यांची उचलबांगडी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ‘लढाई हौसले से लढी जाती है.. हत्यारों से नहीं’ असे सांगून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पटोले राज्यातील विविध जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकी घेत आहेत.  त्यानुसार बुधवारी सायंकाळी उशिरा ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली होती.  या बैठकीला ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, प्रदेश सदस्य राजेश जाधव, नईम खान, महेंद्र म्हात्रे, शिल्पा सोनाने, शिरीष घरत, शेखर पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी ठाणे  जिल्ह्यात काँग्रेस कमकुवत असल्याची खंत पटोले यांनी व्यक्त केली. परंतु, ठाणे शहरात काँग्रेसचे काम हे बऱ्यापैकी सुरू असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील इतर ठिकाणीदेखील अशी बांधणी गरजेचे असल्याचेही त्यांनी  सांगितले. 

ठाणे शहर काँग्रेसला बळकटी द्या

ठाण्याबाबत आता गटातटाचे राजकारण आता संपले असले तरी काँग्रेसचे श्रेष्ठी सांगतील त्यानुसार शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलने असतील किंवा इतर कामांमध्ये कार्यकर्त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. मात्र, ठाणे शहर काँग्रेसला श्रेष्ठींकडून बळकटी मिळत नसल्याची खंत या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

पक्षाने ३८ वर्षे आम्हाला काहीच दिले नाही, ना तलवार दिली, ना ढाल, ना बळ दिले आणि लढ म्हणतात. अशा परिस्थितीत आम्ही कसे लढायचे, असा सवाल काही पदाधिकाऱ्यांना यावेळी तळमळीने केला. इतर पक्षातील मंडळी काँग्रेसच्या जीवावर मोठी झाली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेthaneठाणे