शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

...तर नागरिक मतदानापासून जातील दूर; ठाण्यातील साहित्यिकांनी व्यक्त केली खंत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 26, 2025 10:00 IST

निवडणुका केवळ पक्षीय समर्थकांच्या मतदानापुरत्या राहतील मर्यादित

- प्रज्ञा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी समाजाला दिशा दाखवायची असते, मात्र सध्या राजकीय वातावरणात ती दिशाच हरवल्याची भावना नागरिकांत वाढताना दिसते. निष्ठांतर, सत्तेसाठीची धडपड, विकासाच्या नावाखाली होणारी अपारदर्शक चर्चा, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष या सगळ्यामुळे मतदार संभ्रमात आहे. राजकारणाचे हिडीस स्वरूप पाहून उबग आल्यास नागरिक मतदानापासून दूर जातील, अशी भीती ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केली.

सध्या कोणता नेता कोणत्या पक्षात आहे, हेच सामान्य नागरिकांना समजेनासे झाले आहे. कालपर्यंत एका पक्षाचा समर्थक असलेली व्यक्ती आज दुसऱ्या पक्षात जाऊन बंद दाराआड ‘विकासाची’ चर्चा करते. मात्र प्रत्यक्षात नेमके काय घडते, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. सत्तेची हाव सर्वत्र दिसते. साहित्यिक उपक्रमांमध्ये राजकारण्यांचा सहभाग नाही, साहित्यिकांची दखल घेतली जात नाही. कोणत्याही पक्षाला मराठी भाषा आणि संस्कृतीची खरी काळजी असल्याचे दिसत नाही. डॉ. महेश केळुस्कर, कवी

सकल समाजाला दिशा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना, स्वतःची नेमकी दिशा सापडली आहे का? असा प्रश्न पडावा असे राजकीय वातावरण आहे. एक भारतीय नागरिक म्हणून व्यथित व्हावे असा निष्ठांतराचा खेळ, केवळ अत्यंत सवंग शब्दांत काढलेली उणीदुणी, लोभाचे ओंगळ प्रदर्शन असे आजचे चित्र आता यापुढे असेच घरंगळत जाणार असे दिसते. या वातावरणात संवेदनशील नागरिक म्हणून मत तरी काय व्यक्त करणार? ही वैचारिक हतबलता, हीच माझी अत्यंत प्रामाणिक प्रतिक्रिया आहे. प्रवीण दवणे, कवी, लेखक

शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवायची असतील तर किमान पदवीधर नगरसेवकांची गरज आहे; अडाणी प्रतिनिधी नेमून त्याचा काहीही उपयोग नाही. हल्ली एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारताना लोकशाहीचीच गळचेपी होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. सध्या राजकारण्यांमध्ये केवळ चुरस सुरू असून, महापालिका ताब्यात घेण्यासाठी धडपड चालली आहे, कारण त्यातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र या सत्ताकारणात सामान्य माणूस, त्याची गरिबी, समाज आणि परिसरातील वास्तव परिस्थिती पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे. अशा प्रकारचे नगरसेवक आणि राजकीय पक्ष शेवटी जनतेचा विश्वासच घालवतील. परिणामी जनतेचा राजकारणातील रस कमी होईल आणि निवडणुका केवळ पक्षीय समर्थकांच्या मतदानापुरत्याच मर्यादित राहतील.अशोक बागवे, कवी

राजकारणाचा ढोल वाजू लागला आहे; पण सर्वसामान्य लोकांच्या मनात ‘नेमेची येतो मग पावसाळा’ तशा प्रकारचा भाव आहे. पक्ष बघून मत द्यावे तर उभी असलेली व्यक्ती नीट वाटत नाही आणि व्यक्ती बघून मत द्यावे तर तो पक्ष नीट वाटत नाही, अशी काहीशी अवस्था झाली आहे. शिवाय नेमके कोण कोणाबरोबर आहे याचाही संभ्रम आहे. नगरसेवक, नगरसेवक असे म्हणतो पण पुढे जाऊन सेवक हा शब्द मालकमध्ये बदलत जातो, असा अनुभव नवा नाही. असो, आलिया भोगासी.... सतीश सोळांकुरकर, लेखक

English
हिंदी सारांश
Web Title : Voter Apathy Looms: Thane's Writers Lament Political Disillusionment.

Web Summary : Thane writers fear political instability and lack of focus on citizen issues will deter voters. They criticize defections, opaque governance, and neglect of Marathi culture, leading to public disillusionment and potential voter apathy in upcoming elections.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६