शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर पालिकेसमोर गाळ टाकू, विक्रांत चव्हाण यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:21 IST

काँग्रेस-राष्टÑवादीचा इशारा : विक्रांत चव्हाण यांचे उपोषण

ठाणे : पहिल्याच पावसात ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली असून त्याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी बुधवारी ठाणे शहर काँग्रेसने वर्तकनगर प्रभाग समिती समोर एक दिवसाचे उपोषण केले. त्याला राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा दिला. शिवाय यापुढे जर पुन्हा शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली तर नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयसमोर टाकला जाईल, असा इशाराही यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला.

सोमवारी झालेल्या तासाभराच्या पावसातच ठाणे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. पालकमंत्र्यांच्या घरात आणि आयुक्तांच्या बंगल्यासमोरही पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. तर शहरातील वर्तकनगर, नौपाड्यातील चिखलवाडी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिकेने केलेल्या टुकार नालेसफाईच्या विरोधात बुधवारी काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी एक दिवसाचे लाक्षणकि उपोषण केले. त्याला आनंद परांजपे यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, नितीन पाटील, काँग्रेसचे सचिन शिंदे, राजेश जाधव, प्रदीप राव आदी उपस्थित होते. यावेळी ठामपा उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले.यावेळी चव्हाण नालेसफाई योग्य झालेली नसून कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही केला. खुद्द पालकमंत्र्यांच्या घरात पाणी शिरल्याने ते काढण्यासाठीच हे उपोषण केले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या नालेसफाईच्या कामांच्या निविदासुद्धा उशिराने काढल्याने पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका ठाणेकरांना बसला असून या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून नालेसफाईच्या कामांची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली.अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी संगनमतराष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष परांजपे म्हणाले की, साधारणपणे ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याची गरज असतानाही ती कामे पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच सोमवारी रात्री अवघ्या एक तासाच्या पावसामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. वर्तकनगर, नौपाडा आणि मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या.च्गेल्या वर्षी अतिवृष्टीत संभाजीनगर भागातून एक महिला नाल्यातून वाहून गेली होती. तरीही, प्रशासनाला आणि सत्ताधारी शिवसेनेला त्याचे सोयरसुतक नव्हते. अनेक वर्षे एकाच ठिकाणी बसलेल्या या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी हितसंबध असल्याने ते ठेकेदारांवर मेहरनजर करीत आहेत. त्यातूनच नालेसफाई झाली नसतानाहीत्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप परांजपे यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस