शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

थीम पार्कच्या ठेकेदारांनी अखेर भरली ३२ लाखांची रॉयल्टी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 13:21 IST

Thane : अखेर यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ठाणे महापालकेने हालचाल केल्यानंतर अखेर ३२ लाखांची रॉयल्टी जमा केली असली तरी ही रॉयल्टी नेमकी किती होती याबाबत मात्र साशंकता आहे.

ठाणे : थीमपार्कसाठी अनधिकृतने उत्खनन करून रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारांनी अखेर ३२ लाखांची रॉयल्टी भरली आहे. उत्खनन करताना संबंधित ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी घेता उत्खनन केले होते. त्यानंतर तहसिदार कार्यालयाच्या मार्फत ठाणे महापालिकेला पत्र पाठवूनही ठाणे महापालिकेने या ठेकेदारावर कारवाई केली नव्हती. अखेर यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ठाणे महापालकेने हालचाल केल्यानंतर अखेर ३२ लाखांची रॉयल्टी जमा केली असली तरी ही रॉयल्टी नेमकी किती होती याबाबत मात्र साशंकता आहे.

भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या जुने ठाणे नवीन ठाणे या थीम पार्कसाठी अनधिकृतपणे उत्खनन झाले असल्याची बाब यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड झाली होती. विशेष म्हणजे अनधिकृतपणे उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करून रॉयल्टीची दंडासहित वसुली करावी यासाठी ठाणे महापालिकेला तहसिलदारांनी दोन वेळा पत्र देऊनही ठाणे पालिकेने अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नव्हती. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी यासंदर्भात स्थायी समितीच्या बौठकीत प्रश्न उपस्थित केला होता. 

जुने ठाणे आणि नवीन ठाणे या थीम पार्कसाठी करण्यात आलेले उत्खनन देखील अनधिकृतपणे करण्यात आले असल्याची बाब त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निदर्शनास आणली होती . यासंदर्भात आपण ठाणे महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार देखील केला असल्याचे मिलिंद पाटणकर यांनी या बैठकीत सांगितले होते. यासंदर्भात तहसीलदारांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले असून संबंधित ठेकेदाराकडून दंडासहित रॉयल्टी वसूल करून कारवाई करण्यात यावी असे या पत्रात नमूद केले असताना ठाणे महापालिकेने ठाणे महापालिकेने यासंदर्भात काहीच कारवाई केली नव्हती.             जुने ठाणे नवीन ठाणे थीम पार्कसाठी उत्खनन करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे उत्खनन केले असून शासनाची कोट्यवधीची रॉयल्टी बुडवली असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बाळकूम मंडल अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यानंतर सादर ठिकाणी थीम पार्कचे काम पूर्ण झाले होते. तसेच तसेच संबंधित ठेकेदाराने गौखनिज संदर्भात स्वामित्वाची रक्कम ठाणे महापालिकेकडे जमा केली आहे का? काम झाल्यापासून किती गौणखनिज खरेदी केले? ते कुठून आणले अशी विचारणा ठाणे पालिकेला पत्राद्वारे करण्यात आली होती.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका