शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मातीचा भराव टाकून वरसावे गावकऱ्यांच्या तलावाची चोरी; जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:32 IST

वरसावे गावक-यांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षापासून उपयुक्त ठरत आहे. गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपवण्यासाठी त्यात अवैधरित्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावे   गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उता-यावर देखील आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रार देखील काशिमीरा पोलिसात तलावाचा भूखंड हडप करण्याच्या उद्देशानेअवैधरित्या विकासकाकडून मातीचा भराववरसावे गावक-यांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षापासून उपयुक्त

ठाणे : घोडबंदर रोडला लागून असलेल्या वरसावे गावातील सार्वजनिक तलावात अवैधरित्या विकासकाकडून मातीचा भराव करून तलाव नष्ठ करण्यात येत आहे. तलावाचा भूखंड हडप करण्याच्या उद्देशाने तलाव नष्ठ केला जात असल्याचे गावक-यांकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर सार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रार देखील काशिमीरा पोलिसात दाखल केली. तर श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिका-यांना साकडे घालून या तलावाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करून कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.वरसावे गावक-यांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षापासून उपयुक्त ठरत आहे. गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपवण्यासाठी त्यात अवैधरित्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावे   गावक-यांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उता-यावर देखील आहे. या सार्वजनिक तलावाचा हक्क वरसावे गावक-यांकडे असतानाही त्यात मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला आहे, असे जेष्ठ नागरिक रविंद्र गायकर या गावक-याने काशिमीरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर श्रमजीवी संघटनेने देखील जिल्हाधिका-यांकडे तक्रार करून वरसावे गावक-यांचा सार्वजनिक तलाव नष्ठ केल्याचे नमुद केले आहेत. यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष अशोक सापटे, सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर यांनी जिल्हाधिका-यांना लेखी तक्रार देऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.वरसावे गावामध्ये आदिवासी समाज मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहे. पारंपारिक पध्दतीने येथील आदिवासी समाज या तलावात परंपरेनुसार मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. पिण्याच्या पाण्यासाठी या तलावातील पाण्याचा वापर केला जातो. त्यावर शेतीचे उत्पादन देखील घेतले जात आहे. या तलावावर वरसावे गावक-यांचा हक्क असल्याची नोंद सातबारा उता-यावर देखील आहे. पण तलावाचा हा भूखंड हडप करण्यासाठी विकासकाकडून त्यात अवैध मातीचा भराव करण्यात आला. हा जुना सार्वजनिक तलाव नष्ठ करणा-या विकासकाचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. याशिवाय अवैधरित्या टाकलेला भराव पूर्णपणे काढून हा सार्वजनिक तलाव मोकळा करण्यात यावा, त्याची लांब, रूंदी व खोली वाढवण्यात यावी आदी मागण्यासाठी श्रमजीवीने जिल्हाधिका-यांना साकडे घालून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तर चोरीला गेल्या या तलावाचा शोध घेण्यासाठी पोलिसात लेखी तक्रार केली आहे. यानुसार जिल्हाप्रशासन व पोलिस यंत्रणा या तलावास नष्ठ करणा-यां विकासकावर काय कार्यवाई करणार, याकडे आता सर्वाचे लक्ष लागून असल्याचे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी लोकमतला सांगितले.........

टॅग्स :thaneठाणेDamधरण