शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे आंदाेलनाचा ‘ताे’ गुन्हा अमान्य: राज ठाकरे

By जितेंद्र कालेकर | Updated: December 11, 2025 19:04 IST

उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाणीचा आराेप: आता सुनावणी १६ डिसेंबरला

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: रेल्वे विभागाने २००८ मध्ये राबविलेल्या भरती प्रक्रीयेच्या वेळी उत्तर भारतीय उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला हाेता. याच प्रकरणात मनसेच्या सात कार्यकर्त्यांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला हाेता.

याच प्रकरणात राज यांनी ठाणे सत्र न्यायालयात गुरुवारी सकाळी हजेरी लावली. त्यावेळी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचे त्यांनी न्यायालयापुढे सांगितले. त्यानंतर आराेप निश्चित (चार्ज फ्रेम) करुन हा खटला पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाला सहकार्य करा, एक महिन्यातच खटला निकाली लागण्याची शक्यता असल्याचेही ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

असे हाेते प्रकरण-

रेल्वेतील काही पदांसाठी अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने १९ ऑक्टाेबर २००८ राेजी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. मुंबईत या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तसेच बिहारी उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आराेप झाला हाेता. याच संदर्भात कल्याण रेल्वे पेालीस ठाण्यात आकाश काळे, संताेष ठाकरे, िवशाल कांबळे, कैलाश चाैबे, गणेश चाैबे, शैलेश जैन आणि निलेश घाेणे या सात जणांविरुद्ध २०१९ मध्ये आराेपपत्र दाखल झाले हाेते. पुरवणी आराेपपत्रात मनसे अध्यक्ष राज यांचेही नाव समाविष्ट केले हाेते.

आराेपींपैकी निलेश घाेणे याचा मृत्यू झाला. यापूर्वीची सुनावणी १२ नाेव्हेंबर २०२५ राेजी झाली हाेती. त्यावेळी राज हे न्यायालयात गैरहजर हाेते. १२ डिसेंबरच्या सुनावणीसाठी सर्व आराेपींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. शिवाय (राज ठाकरे वगळता) सातही आराेपींना न्यायालयाने अटक वाॅरन्ट बजावले हाेते. त्यामुळेच गुरुवारी राज यांच्यासह सर्वच आराेपी न्यायालयात हजर हाेते. सकाळी ११ वाजता सुनावणी सुरु झाल्यानंतर रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाणीचा गुन्हा कबूल आहे का? अशी राज यांना न्यायालयाने िवचारणा केली. तेंव्हा गुन्हा अमान्य असल्याचे त्यांनी उत्तर दिले.

त्यानंतर चार्ज फ्रेम करीत असल्याचे सांगत सहकार्य करण्याचे आवाहनही न्यायालयाने राज यांना केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या सुनावणीतच पुढील तारीख मिळाल्यानंतर राज न्यायालयाच्या बाहेर पडले. ॲड. राजेंद्र शिराेडकर, सयाजी नांगरे, ओंकार राजूरकर आणि मंदार लाेणारे आदींनी राज यांच्यासह सर्व आराेपींची बाजू मांडली. या सुनावणीनंतर न्यायालयाच्या बाहेर आणि शासकीय विश्रामगृहात राज यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मनसे आणि शिवसेनेच्या उद्धव गटाने माेठी गर्दी केली हाेती.यातील राज ठाकरे वगळता सात आराेपींना प्राेक्लमेशन जारी केले हाेते. आज सर्व आराेपींचे प्राेक्लेमेशन रद्द झाले. पुढील सुनावणी आता १६ डिसेंबरला हाेणार आहे. - ॲड. ओकार राजूरकर, राज ठाकरे यांचे वकील.

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray Denies Guilt in Railway Agitation Case

Web Summary : Raj Thackeray appeared in Thane court, denying involvement in the 2008 railway recruitment violence case. Charges were framed, and the trial proceeds with a likely quick resolution. He was accused of inciting MNS workers to attack North Indian candidates.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेCourtन्यायालय