शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातील गैरसोयींची राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली दखल

By धीरज परब | Updated: February 16, 2023 20:17 IST

शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार मिळत नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात अवास्तव पैसे मोजून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे.

मीरारोड - भाईंदर मधील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयातील गैरसोयी , अपुरे मनुष्यबळ व रुग्णांची होणारी हेळसांड याची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने शासनासह ठाणे जिल्हाधिकारी व मीरा भाईंदर महापालिकेस नोटीस बजावून २ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत . 

न्यायालयाच्या तंबी नंतर मीरा भाईंदर महापालिकेने भाईंदर पश्चिम येथे पंडित भीमसेन जोशी हे २००  खाटांचे ४ मजली रुग्णालय बांधले . परंतु रुग्णालय बांधून देखील अत्यावश्यक उपचार - शस्त्रक्रिया होत नव्हत्या . त्यामुळे रुग्णालय ऐवजी दवाखाना म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली . रुग्णालय चालवणे खर्चिक असल्याचे सांगून तत्कालीन नगरसेवक व आमदार आदींसह पालिका प्रशासनाने देखील पालिकेचे हे रुग्णालय शासनाच्या हवाली केले . परंतु शासना कडे  रुग्णालय जाऊन सुद्धा अत्यावश्यक शास्त्क्रिया व उपचार व सुविधा मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत . त्यातच अपुरे डॉक्टर व मनुष्यबळ आणि त्यांना देखील पगार वेळेवर मिळत नसल्याने एकूणच रुग्णालयाची आरोग्यसेवा कोलमडलेली आहे . 

शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार मिळत नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात अवास्तव पैसे मोजून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. याची राज्याच्या मानवी हक्क आयोगाने दखल घेत स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव,  महापालिका आयुक्त व ठाणे जिल्हाधिकारी यांना समन्स बजावले आहेत . २  मार्च पूर्वी रुग्णालया बाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत .