शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 10:17 IST

आठवडाभरात धावणार ई-रिक्षा; विद्यार्थ्यांना ५ तर इतरांना ३५ रुपये भाडे

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : गेली दहा वर्षे माथेरानमध्ये प्रतीक्षेत असलेली ई-रिक्षा सेवा आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. यासाठीची सर्व तयारी नगरपालिका प्रशासनाने केली असून, दोन ते तीन दिवसांत या ई-रिक्षा दाखल होणार आहेत. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ही सेवा सुरू करणयात येणार असल्याचे माथेरान नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले. 

या सेवेसाठीचे दरही निश्चित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना पाच रुपयांत माथेरानला जाता येणार आहे, तर नागरिक व पर्यटकांना ३५ रुपये भाडे आकारले जाणार आहे. दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड ते बाजारपेठ व पुढे विद्यार्थ्यांना सेंट झेवियर्स शाळेपर्यंतचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मुंबई व पुण्याजवळील थंड हवेचे व निसर्गसंपन्न ठिकाण म्हणून माथेरान पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहे.  दरवर्षी दहा लाख पर्यटक येथे भेट देत असतात. यात परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असते.  माथेरान प्रदूषणमुक्त राहावे म्हणून ब्रिटिशकाळापासून येथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे घोडा व हातरिक्षा यांचा वाहतुकीसाठी वापर होत आहे. मात्र, याचा मोठा आर्थिक फटका पर्यटक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. माथेरानचे टॅक्सी स्टँड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिलांची प्रचंड दमछाक होते. आता ती थांबणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ई-रिक्षा सेवा सुरू होणार आहे.

आम्ही श्रमिक रिक्षा संघटनेच्या माध्यमातून माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू होण्यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्नशील होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनीही पाठपुरावा केल्याने ई-रिक्षाचे स्वप्न साकार होत आहे.    - सुनील शिंदे, सचिव,    श्रमिक रिक्षा संघटना, माथेरान

टॅग्स :Matheranमाथेरानthaneठाणे