शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील मजूर दाम्पत्याच्या मुलाचा गुजरातमध्ये लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:46 IST

चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी: पालकांच्या केले स्वाधीन

ठाणे: भिवंडीतील खंडाळपाडा येथून बेपत्ता झालेल्या दहा वषीर्य मुलाचा गुजरातमधील गांधीनगर येथून शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे. त्याला सुखरुपपणे बुधवारी आई वडिलांच्या स्वाधीन केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

गुजरातमधील अहमदाबाद येथील कालूपूर रेल्वे सनकामध्ये पालक नसलेल्या अवस्थेमध्ये ५ मार्च २०२२ रोजी दहा वर्षीय भावेश राठोड हा मुलगा मिळाला असून त्याला गांधीनगरच्या सरकारी बालगृहामध्ये ठेवल्याची माहिती या बालगृहाच्या अधिकारी नीलम भावसार यांच्याकडून ३० मार्च २०२२ रोजी ठाणे पोलिसांना दिली. ठाणे जिल्हयातील कल्याण बायपास रोड येथील शंकर मंदिराजवळ वास्तव्यास असल्याची माहिती विचारपूस केल्यानंतर त्याने दिल्याचेही भावसार यांनी सांगितले. पोलीस पथकाच्या मदतीने त्याच्या पालकांचा शोध घेण्यात यावा, असेही त्यांनी कळविले. त्यानुसार ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जमादार एस. एन. जाधव, हवालदार एस. आर. साळवी, एस.टी. चौधरी, एस. व्ही. दोंदे, जमादार व्ही. पी. वेंगुर्लेकर आदींच्या पथ्रकाने भावेश याच्या कल्याण बायपास रोडवरील खंडाळपाडा, आदीवासी पाडयात त्याच्या पालकांचा शोध घेतला.तेंव्हा भिवंडीतील भादवड गावातील प्रकाश धेंडे यांच्या चाळीतील रहिवासी मंजू राठोड (३२) आणि ललीता राठोड (२८) हेच त्याचे पालक असल्याची माहिती समाेर आली. त्यानुसार त्यांच्या व्हिडीओ कॉलद्वारे भावेशची भेट घडवून आणली. तेंव्हा तो आपलाच मुलगा असल्याचे राठोड दाम्पत्याने ओळखले. शाळेच्या इतर कागदपत्रांच्या आधारे त्याची कागदाेपत्री ओळखही पटविण्यात आली. त्यानंतर गुजा्रातमधील गांधीनगरच्या बाल कल्याण समितीच्या अधिकाा्र्यांच्या परवानगीने भावेश याला मंगळवारी पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ताे गुजराथमध्ये कसा गेला, याची माहिती मात्र ताे सांगू शकला नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीGujaratगुजरात