शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गोवर सर्व्हे पथकाला सोसायटीचा दम, दरवाजा लावल्याने कर्मचाऱ्याची बोटे अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 10:11 IST

गोवर रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  मुंब्रा आणि आसपासच्या परिसरात गोवराचे रुग्ण शोधण्यासाठी फिरणाऱ्या पथकाच्या अंगावर अख्ख्या सोसायटीने धावून जाण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी पथकाच्या तोंडावर दरवाजा बंद करण्यात आला. एका ठिकाणी दरवाजात पथकातील एका कर्मचाऱ्याची बोटे अडकली. असे प्रकार घडत असल्याने सर्वेक्षणासाठी जायचे कसे असा प्रश्न पालिकेच्या पथकाला पडला आहे. घाबरून काही कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाला जाण्यास विरोधही सुरू केल्याचे समजते.

गोवर रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे. मात्र, मुंब्य्रात सर्व्हे करण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत आहेत. अमृतनगर भागात सर्व्हेसाठी गेलेल्या पथकाला इमारतीमधील सर्व रहिवासी मारहाण करण्यासाठी धावून आल्याने गंभीर प्रसंग निर्माण झाला होता. काही कुटुंबांनी घरात असतांनाही बाहेरून कुलूप लावून घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या. घरातच लपून बसण्याचे प्रमाण या भागात अधिक असल्याचे सर्व्हेत दिसून आले. लसीकरण आज नको उद्या या, असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला कुलूपलावून बाहेर निघून जाण्याचे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्व्हे कसा करायचा  आणि नंतर लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न महापालिकेच्या पथकांना पडला आहे. यामुळे पालिका पथकाला पोलिस संरक्षण देण्याची मागणी होत आहे.

 शाळा व्यवस्थापनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला ताप आला असेल तर शिक्षकांनी त्याला लागलीच घरी पाठविणे गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले.  लसीकरणाबाबत चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

गोवराचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. तसेच सर्व्हेवर भर दिला आहे. सर्व्हेसाठी १६० पथके तयार केली आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील सर्व्हे झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हे सुरू आहे. तो पूर्ण झाल्यावर पुन्हा सर्व्हेचे काम तिसऱ्या टप्प्यात सुरू होणार आहे. गोवराची साखळी रोखणे त्यामुळे शक्य होणार आहे.    - अभिजित बांगर, आयुक्त, ठामपा

टॅग्स :thaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका