शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

‘गडकरी रंगायतन’ची आसन क्षमता होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:14 IST

९६० आरामदायी खुर्च्या बसवल्या जाणार.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. परंतु, आता नव्याने होऊ घातलेल्या रंगायतनमध्ये आरामदायी खुर्च्यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. त्यामुळे रंगायतनमधील आसन क्षमता कमी  होणार असून, आता ९६० प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट, दोन वाढीव शौचालये आणि ४७ वर्षांनंतर येथील पडदा बदलला जाणार असून, त्याच महिलेला पुन्हा तसाच पडदा बनविण्याचे काम देण्यात आले आहे. 

सन १९७८मध्ये बांधलेल्या रंगायतनची आसनक्षमता सध्या १,०८० एवढी आहे. पूर्वी आखूड खुर्च्या होत्या. त्यामुळे बसण्यासही रसिकांना त्रास होत होता. आता येथे आरामदायी खुर्च्या बसविल्या जाणार आहेत. त्यामुळे आसनक्षमता १२०ने कमी होणार आहे. याशिवाय या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठांना आता पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत. त्यांना या ठिकाणी पारदर्शक पद्धतीची कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या या ठिकाणी अवघ्या दोन ते तीन तिकीट खिडक्या आहेत. परंतु, आता या खिडक्यांची संख्या वाढविली जाणार आहे. या ठिकाणी आता सहा खिडक्या होणार आहेत.

पडदा कात टाकणारगडकरी रंगायतनचा पडदा खादी आणि गादीच्या कापडाचा वापर करून ४७ वर्षांपूर्वी अवघ्या २० हजारांत नंदा चारी या विद्यार्थिनी असताना तयार केला गेला. परंतु, आता त्याच पद्धतीचा अगदी तसाच पडदा तोदेखील नंदा यांच्याच हातून तयार करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार आता पडद्याचे कामही सुरू झाले असून, त्यावर २२ लाख रुपये खर्च होणार आहे. 

...ही केली जाणार कामेमुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नूतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मींसाठी  असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा करणे, रंगमंच - फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलित यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्ययावतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे आहे. या कामासाठी २३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. राज्य शासनाकडून हा निधी ठाणे महापालिकेला उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :thaneठाणे