शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवन क्षेत्रात बेकायदा भराव करून बांधकाम केल्या प्रकरणी महसूल विभागाने दाखल केले दोन गुन्हे

By धीरज परब | Updated: June 9, 2024 23:59 IST

दुरुस्ती परवानगीच्या आड बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हद्दीत वरसावे व घोडबंदर ह्या दोन ठिकाणी कांदळवन क्षेत्रात बेकायदा भरीव करून बांधकाम केल्या प्रकरणी महसूल विभागाने काशिगाव पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत . तर वरसावे येथे कांदळवन ऱ्हासाचे गुन्हे दाखल असताना दुरुस्ती परवानगी देणारे आणि त्या आड झालेल्या बेकायदा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करा अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे . 

राष्ट्रीय महामार्ग लगत वरसावे येथील सर्व्हे क्रं. २३ हिस्सा क्रं. १ मध्ये दरे पटेल कंपाउंड आहे . ह्या ठिकाणी कांदळवन तोडल्या बद्दल महापालिकेनेच गुन्हे दाखल केले होते . तसे असताना पालिकेचे तत्कालीन प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी दुरुस्ती परवानगी दिली . दुरुस्ती परवानगी आड भलेमोठे नवीन बेकायदा बांधकाम करून मेट्रो द रॉयल नावाने हॉटेल थाटण्यात आले . सदर बेकायदा बांधकामास पालिकेने सातत्याने संरक्षण दिले . 

या प्रकरणी अपर तहसीलदार यांच्या आदेशा वरून तलाठी अभिजित बोडके यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात कांदळवन नष्ट करून त्यात बेकायदा भराव व बांधकाम केल्या बद्दल गुन्हा दाखल केला आहे . तर या प्रकरणी पालिकेचे स्वप्नील सावंत सह संबंधित अधिकारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे . 

दुसरीकडे हाटकेश - घोडबंदर मार्गावर असलेल्या मौजे घोडबंदर  सर्व्हे क्रं. ३९ व ४० पैकीच्या काही क्षेत्रात इंद्रजित टाटा मोटर्स चे बेकायदा शेड आणि बांधकाम आहे . सदर क्षेत्र कांदळवन पासून ५० मीटर बफर झोन मध्ये तसेच खाडी जवळ केले असल्याने त्याची तक्रार केली गेली होती .याप्रकरणी कांदळवन समितीची स्थळपाहणी होऊन काशिगाव पोलिस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार तलाठी बोडके यांनी  गुन्हा दाखल केला आहे.

ह्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस करत आहेत . तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून झालेल्या बेकायदा भराव आणि बांधकामावर महापालिका कधी कारवाई करणार ? असा प्रश्न देखील पर्यावरण प्रेमींनी केला आहे .