- सदानंद नाईक उल्हासनगर - गेल्या दोन वर्षापासून खाली केलेल्या धोकादायक शिव जगदंम्बा इमारतीचा मागचा भाग गुरुवारी रात्री कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून इमारतीचा मलबार एका घरावर पडल्याने, घराला तडे गेले. तसेच ऐक दुचाकी मलब्याखाली गाडली गेली.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकूण २६३ धोकादायक इमारती जाहीर केल्या. त्यापैकी एकूण ६० इमारती सावधगिरी म्हणून खाली केल्या आहेत. त्यातील अतिधोकादायक इमारती मशीनद्वारे जमीनदोस्त करण्याचे काम महापालिका करीत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. कॅम्प नं-३, सी ब्लॉक परिसरातील तळमजला अधिक पाच मजली शिव जगदंम्बा इमारत ३० वर्षांपूर्वी बांधली. इमारत धोकादायक झाल्याने, फ्लॉटधाराकांनी इमारतीच्या दूरस्तीसाठी इमारत गेल्या दोन वर्षापूर्वी खाली केली. मात्र इमारतीची दूरस्ती केली नाही. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान इमारतीचा मागचा भाग कोसळला. रात्रीची वेळ असल्याने व इमारत खाली असल्याने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका घराचे नुकसान होऊन, ऐक दुचाकी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
६० इमारती कारवाईच्या प्रतीक्षेतमहापालिकेने एकूण ६० अतिधोकादायक व धोकादायक इमारती खाली केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक इमारती अद्यावत मशीनद्वारे जमीनदोस्त केल्या जात आहेत. इतर इमारतीही कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.
इमारतीवर पाडकाम कारवाईशिव जगदंम्बा इमारतीमुळे शेजारील इमारतीला धोका निर्माण झाला असून इमारती भोवती महापालिका कर्मचारी तैनात आहेत. इमारतीवर लवकरच तोडक कारवाईची शक्यता सहाय्यक आयुक्त शिंपी यांनी व्यक्त केली.
नुकसान भरपाईची मागणी इमारतीचा मलबार खान नावाच्या इसमाच्या घरावर पडल्याने, संपूर्ण घराला तडे गेले. तसेच त्याची दुचाकी ढीगाऱ्या खाली गाडली गेली. महापालिकेने धोकादायक झालेले घर पुन्हा नव्याने बांधून द्यावे. असी मागणी शौकत खान नावाच्या इसमाने केली.