शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

महापालिकेचा मालमत्ता कर विभाग लागला नव्या आर्थिक वर्षात कामाला

By अजित मांडके | Updated: April 3, 2023 16:30 IST

पहिल्या तीन दिवसात ६ कोटींचा भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मार्च अखेर तब्बल ७२२ कोटींची विक्रमी वसुली केली आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरु होत नाही तोच या विभागाने १ एप्रिल पासून वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ठाणेकरांच्या मोबाइल पहाटे पाच वाजल्यापासून मेसेज धडकले. नागरीकांनी देखील महापालिकेच्या या मेसेजची दखल घेत, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ कोटी ९३ लाखांचा  भरणा करीत याला प्रतिसाद दिला. तर पहिल्या तीन दिवसात तब्बल ६ कोटींचा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे. अनेकांना मोबाइलवर तर काहींनी थेट त्यांच्या मेलवरच मालमत्ता कराची पावती पाठविण्यात आल्याने आता या विभागाने पेपरलेस कारभाराकडे पाऊल टाकल्याचे दिसून आले.

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदा विक्रमी वसुली केली आहे. ३१ मार्च अखेर महापालिकेच्या तिजोरीत ७२२ कोटी ११ लाखांची वसुली झाली आहे. यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील सर्वाधिक २३२.५९ कोटींची वसुली झाली आहे. त्या खालोखाल मुख्यालयाचा ९७.३३ भरणा झाला आहे. त्यातही महापालिकेने मागील वर्षापासून आॅनलाईन बील भरणा करण्यासाठी विविध प्रयोग हाती घेतले होते. त्याला नागरीकांना प्रतिसाद देत, मालमत्ता कराचा भरणा केला. यात रोख स्वरुपात ९३.९२ कोटी, चेक - ३५६.१९ कोटी, डीडी - १०३.०१ कोटी, आॅनलाईन १६६.९५ कोटी आणि कार्डद्वारे २.०४ कोटींचा भरणा झाल्याचे दिसून आले आहे.

आता नव्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आपला कारभार पेपरलेस करण्यासाठी पावले उचलली आहे. त्यानुसार सरते आर्थिक वर्ष संपत नाही तोच १ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ठाणेकर नागरीकांच्या मोबाइल महापालिकेचे मेसेज धडकले. त्यात चालू वर्षाचे बील त्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार आता पर्यंत १ लाख २५ हजार ठाणेकरांना हे मेसेज आतापर्यंत गेले आहेत. तर अनेकांच्या मेलवरच थेट बील पाठविण्यात आले आहे. महापालिकेच्या या आॅनलाईन आवाहनाला प्रतिसाद देत १ एप्रिल रोजी १.९३ कोटी, २ एप्रिल रोजी ३.०१ कोटी आणि ३ एप्रिल रोजी जवळ जवळ अडीच कोटींचा भरणा नागरीकांनी केला आहे. यापूर्वी ठाणेकरांना मे अखेर पर्यंत घरपोच बिले दिली जात होती. परंतु आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेने या आॅनलाईन पध्दतीचा अवलंब केल्याने महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कर विभागाला पहिल्याच दिवशी वसुली करता आलेली आहे.

२०२२-२३ मध्ये विक्रमी वसुली२०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने तब्बल ७२२ कोटींची वसुली केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३० कोटींची अधिक वसुली झाल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी वसुली ही ५ टक्यांने वाढल्याचे दिसत असते. मात्र यंदा हीच वसुली २२ टक्के अधिक दिसून आली.

तासनतास रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणारमहापालिकेने आॅनलाईन कर भरण्यासाठी नागरीकांना जी पे, फोन पे आदींसह इतर पर्यांयाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार ज्या नागरीकांना आता फोनवर किंवा मेलवर बिले गेली आहेत, त्या बिलांवरच कशा पध्दतीने कराचा भरणा करता येऊ शकतो. याची माहिती देण्यात आलेली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका