शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिघे यांचा वारसा कोण पुढे नेणार, ते जनताच ठरवेल; राजन विचारे यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 05:53 IST

आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत आणि सर्व बघत आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्यांना तेच शिक्षा देतील.

ठाणे :

आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत आणि सर्व बघत आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्यांना तेच शिक्षा देतील. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेतो हे आगामी निवडणुकीत जनताच दाखवेल, अशी टीका शिवसेना खासदार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केली.

स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खारकर आळीतील शक्तिस्थळावर दिघे यांना अभिवादन करण्यासाठी खासदार राजन विचारे तसेच स्व. दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर आणि महिला आघाडीच्या अनिता बिर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे गट असे चित्र निर्माण झाले. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

विचारे यांचा व्हिडीओ व्हायरलजेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात ते झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरे, ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला, असा संदेश विचारे यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे दिला.ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने सामनेस्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आनंद आश्रमात ठाकरे गट विरुद्ध शिदे गट हे आमने सामने आल्याचे दिसून आले.मुख्यमंत्री शिंदे हे आनंद आश्रमात येणार म्हणून त्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आदींसहइतर पदाधिकारी उपस्थित होते. परंतु त्याच वेळेस शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि इतर पदाधिकारी हजर झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांची संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर पकड आहे. शुक्रवारी शक्तिस्थळावर ठाकरे गटाच्या माध्यमातून खा. विचारे यांनी शिंदे यांना आव्हान दिले.दिघे यांच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मोठ्या पदापर्यंत पोहोचला. दिघे हे शिवसेना या चार अक्षरांसाठी शेवटपर्यंत जगले, असे सांगत विचारे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्यावर टीका केली. कोण कोणाच्या हृदयात आहे हे येत्या निवडणुकीत जनताच दाखवेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे