शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाच्या बिहार येथून आवळल्या मुसक्या

By नितीन पंडित | Updated: September 20, 2023 16:22 IST

भिवंडी: सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात ...

भिवंडी: सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलीस पथकाने बिहार राज्यात जाऊन आरोपी सलामत अंसारी वय ३२ यास अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले आहे.आरोपी सलामत अन्सारी हा भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात बिगारी काम करीत होता.मयत चिमुरडी चॉकलेट खाण्यासाठी सलामत कडे पैसे मागत होती.त्यावेळी त्याने तिला खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती माहिती ढवळे यांनी यावेळी दिली.

 शहरातील फेणेगाव परिसरातील एका चाळीत राहणारी सहा वर्षीय चिमुरडी १३ सप्टेंबर रोजी हरवली होती.सायंकाळी उशिरा पर्यंत दिसून न आल्याने पालकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.रात्री उशिरा चिमुरडीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेत असताना १५ सप्टेंबर रोजी चिमुरडी राहत असलेल्या परिसरात दुर्गंधी येत  असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोध घेतला.

तेथील एक कुलूप बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला होता.त्याच खोलीमध्ये मिळालेल्या पुराव्याचे आधारे आरोपीचे नाव सलामत असे निष्पन्न झाले होते.पोलिसांना तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बिहार राज्यात पळून गेल्याची माहिती मिळाली.घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त महेश पाटील,भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शना खाली तीन पोलिस पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम,पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पाटील,कोलते,पोलिस हवालदार खाडे,राणे,पोलिस शिपाई भांगरे,गावीत,हरणे,ताटे,सोनावणे,पोलिस नाईक पवार,गवा,कोळी,कदम,पराड,नंदिवले या पथकाने बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावात वेषांतर करून पाळत ठेऊन संशयित सलामत अली आलम अन्सारी यास ताब्यात घेतले.त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने,आरोपीस स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने भिवंडीत आणून अटक करण्यात आली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत ढवळे यांनी दिली आहे.