शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने केली ४७ अनाधिकृत शाळांची यादी जाहीर; ४२ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश

By अजित मांडके | Updated: May 6, 2023 15:58 IST

शाळा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का हे पडताळून न पाहता, पालक प्रवेश घेत असतात.

ठाणे : ठाणे महापालिकेने आता शहरातील अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली  आहे. त्यात ४७ शाळा या अनाधिकृत असल्याचे पालिकेने सांगितले. त्यानुसार या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नका अशी सुचना देखील महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्यातही या ४७ शाळांमध्ये तब्बल ४२ शाळा या इंग्रजी माध्यमाच्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच हिंदी माध्यमाच्या ३ आणि मराठी माध्यमाच्या दोन शाळांचाही समावेश आहे.

शाळा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का हे पडताळून न पाहता, पालक प्रवेश घेत असतात. कालंतराने त्या शाळेला शासनाची मान्यता नसल्याचे समोर आल्यानंतर पालकांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. शिक्षण हक्क कायदयातील कलम १८ नुसार कोणतीही शाळा संबंधीत शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्याता, ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करता येत नाही, असे नमुद केले आहे.

कायदयाच्या कलम १८ (५) अन्वये राज्य मंडळाशी संलग्नित शाळांकरीता राज्यशासनाचे परवानगी आदेश व सीबीएससी, अयसीएससी, आयबी, आयजीसीएसई, सीआयई आदी मंडळाशी संलग्नित शाळांकरीता राज्यशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र या आदेशाशिवाय शाळा सूरु असल्यास अशा शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार नुकतेच ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या ३७ शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली असून या शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यामतून नोटीसा बजाविण्यात आल्या. आता ठाणे पालिका क्षेत्रात देखील ४७ शाळा ह्या अनधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. 

ठाणे महापलिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा, दिवा या भागांमध्ये अनधिकृत शाळांची जत्राच भरली असल्याचे दिसून येत आहे. तर, घोडबंदर रोड, बाळकुम या भागांमध्ये देखील अनधिकृत शाळा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या भागांमध्ये अनधिकृतपणे सुरु असलेल्या ४७ शाळांपैकी सर्वाधिक इंग्रजी मध्यामच्या ४२ शाळांचा तर, हिदी माध्यमाच्या ३ आणि मराठी मध्यामच्या दोन शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या अनधिकृत शालंवर पालिका प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

 अनधिकृत शाळांना तीन नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच दंडात्मक कारवाईची नोटीस देखील बजाविण्यात आली आहे. तसेच शाळांच्या दर्शनीभागात शाळा अनधिकृत असल्याचे फलक लावण्यात आले असून पोलीस आयुक्तांना देखील पत्र दिले आहे. त्यानुसार कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.  - बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी, ठामपा

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे