शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

माेबाइल पुन्हा सापडण्याचे प्रमाण केवळ सव्वा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 11:34 IST

चार महिन्यांत १,६०० गहाळ : परत मिळाले १८३ माेबाइल

- धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्कमीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांतील गहाळ झालेले व चोरीला गेलेल्या मोबाइलची संख्या सुमारे १,६०० च्या घरात असून, त्यापैकी केवळ १८३ मोबाइल हस्तगत केले आहेत. त्यामुळे मोबाइल पुन्हा मिळविण्याचे प्रमाण अवघा एक ते सव्वा टक्का इतकेच आहे. त्यातही चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला जात असला, तरी गहाळ झालेल्या मोबाइल प्रकरणात गुन्हा दाखल केला जात नसल्याने, सापडलेले मोबाइल प्रामाणिकपणे परत करण्याचे प्रमाण नाममात्र आहे. 

पोलिस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागातून दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागात जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांतील गहाळ मोबाइलची संख्या १ हजार ४६० इतकी आहे. त्यापैकी ६७ मोबाइल पोलिसांना सापडले आहेत. ५२ मोबाइल हे संबंधित व्यक्तींना परत केले गेले. याच कालावधीत मोबाइल चोरीचे ११० गुन्हे दाखल झालेले आहेत, तर ५५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ११६ मोबाइल हस्तगत केले आहेत. ५० मोबाइल नागरिकांना परत केले आहेत. 

प्रवासात विसरण्याच्या घटना अधिक    रिक्षा, बस, ट्रेन आदींमध्ये प्रवासाच्या दरम्यान वा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोबाइल विसरण्याचे, पडण्याचे प्रकार हे जास्त हाेतात. त्यामुळे गहाळ मोबाइलच्या नोंदी जास्त आहेत, असे सांगितले जाते. गहाळ झालेला मोबाइल हा कोणाला ना कोणाला सापडलेला असतो.     या माेबाइलची विक्री, तसेच वापर करणे हा फौजदारी दखलपात्र गुन्हा आहे. मात्र, पोलिस तसे गुन्हे दाखल करत नसल्याने, चोरटे व लबाडी करणारे मोकाट आहेत.    पोलिसांनी हरवलेला मोबाइल परत करणाऱ्यांचे कौतुक करणे जसे आवश्यक आहे, तसेच मोबाइल लबाडीने स्वतःकडेच ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. 

विदेशातही हाेते विक्रीगहाळ झालेले मोबाइल हे पुन्हा वापरात आल्यास त्याच्या आयएमईए क्रमांकावरून पुन्हा सापडतात. चोरी झालेले मोबाइल हे देशातच नव्हे, तर ते नेपाळ, बांगलादेशपासून अन्य देशांतही विक्रीसाठी पाठविले जातात. मोबाइलमधील महागडे पार्ट विक्री केले जातात. मात्र, हे खूपच कमी प्रमाण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुलगी रिक्षात प्रवास करत असताना २३ एप्रिल, २०२१ रोजी १२ हजारांचा मोबाइल गहाळ झाला होता. पोलिसांनी त्यावेळी मोबाइल मिळेल, असे आश्वस्त केले होते. नुकताच पोलिसांनी तो मोबाइल परत मिळवून दिला आहे. मोबाइल सुस्थितीत आहे. यामुळे पोलिसांवरील विश्वास आणखी वाढला असून आनंद झाला.    - बाळासाहेब गोडसे, काशिमीरा

टॅग्स :theftचोरी