शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मीरारोडच्या आलिशान एमआयसीएल गृहसंकुलात क्रिकेट वरून रहिवाश्यांमध्ये राडा 

By धीरज परब | Updated: November 18, 2024 22:22 IST

मीरारोडच्या मुंबई - आमदाबाद महामार्गावर ठाकूर मॉल च्या मागे एमआयसीएल आराध्या हायपार्क हे आलिशान गृहसंकुल आहे  .

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - मीरारोड मधील आलिशान व सुशिक्षित वस्तीच्या समजल्या जाणाऱ्या एमआयसीएल आराध्या हायपार्क ह्या गृहसंकुलात क्रिकेट वरून रहिवाशांमध्ये राडा झाला . त्यात एकाचे नाक व डोळा फ्रॅक्चर झालाय तर एकाचे दोन दात तोडल्या प्रकरणी एकमेकांच्या फिर्यादी वरून ९ रहिवाश्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

 मीरारोडच्या मुंबई - आमदाबाद महामार्गावर ठाकूर मॉल च्या मागे एमआयसीएल आराध्या हायपार्क हे आलिशान गृहसंकुल आहे  . सदर गृहसंकुलातील रहिवाश्यां मध्ये आपसात क्रिकेट प्रीमियर लीगचे संघ तयार करून त्यांचा व्हॉटसअप ग्रुप केला गेला होता . 

येथील बी विंग मध्ये राहणारे रहिवाशी निखिल तुळशीदास जांबवलीकर ( वय ३९ ) यांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरुयादी नुसार , क्रिकेट लीगच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये चर्चे दरम्यान सुरेंद्र थांधिया यांनी तुमच्यात दम असेल तर खाली भेटण्यासाठी या असा संदेश टाकला . 

निखिल हे क्रिकेटचा सराव करण्यासाठी गृहसंकुलाच्या आवारात आले असता थांधिया यांनी त्यांना शिवीगाळ सुरु केली . थांधिया यांनी निखिल यांना धक्का मारला असता  ते लगत असलेल्या इम्रान अन्सारी ( वय ४९ ) यांच्या अंगावर पडले . 

त्याचा राग येऊन इम्रान याने हातातील कड्याने  निखिल यांना तोंडावर मारहाण सुरु केली . त्यात निखिल यांचे दोन दात तुटले व जखम झाली . तर थांधिया सह तेथे असलेले  आशिष सावंत ( वय ४० वर्षे ) , युगांत कदम ( वय ३८ वर्षे )  आणि सोहेल सय्यद ( वय ४० वर्षे ) यांच्यासह थांधिया यांनी मिळून निखिल यांना लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली. 

१७ नोव्हेम्बर रोजीच्या निखिल यांच्या फिर्यादी नंतर काशीमीरा पोलिसांनी  सुरेंद्र थांधिया , इम्रान अन्सारी, आशिष सावंत, युगांत कदम व सोहेल सय्यद ह्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

त्या आधी सुरेंद्र थांधिया यांच्या फिर्यादी वरून चिराग सुतार , निखिल जांबवलीकर , प्रदीप घाडगे व उमेश नायर ह्या चौघांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता . 

क्रिकेट प्रीमियर लीग वरून चिराग , निखिल , नायर व घाडगे ह्या चौघांनी थांधिया यांना ठोश्या बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली . मारहाणीत थांधिया यांच्या नाकाला व डोळ्याला जबर मार लागून फ्रॅक्चर झाले आहे . 

 पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत . सदर राड्या नंतर पुन्हा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी रहिवाश्याना सार्वजनिक उपक्रम व कार्यक्रम तूर्तास करू नये असे बजावले आहे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी